IPL 2023 : मुंबई इंडियन्सची डोकेदुखी वाढली, 'या' खेळाडूला चावला कुत्रा

अर्जून स्वत: याबाबत माहिती देताना दिसत आहे. यात तो त्याच्या हाताच्या बोटाला कुत्रा चावल्याचे सांगत आहे.
IPL 2023 : मुंबई इंडियन्सची डोकेदुखी वाढली, 'या' खेळाडूला चावला कुत्रा
Published on


क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडूलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जून तेंडूलकर (Arjun Tendulkar) याच्या नावाची सध्या आयपीएलमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. अर्जून हा डाव्या हाताचा फलंदाज असून डाव्याचं हाताचा मध्यम वेगवान गोलंदाज देखील आहे. सध्या अर्जून हा मुंबई इंडियन्य या संघाकडून खेळत आहे. आज लखनौ जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स असा सामना रंगणार आहे. यासाठी दोन्ही टीम लखनौ येथे दाखल देखील झाल्या आहेत. मात्र, या सामन्यापुर्वी मुंबई इंडियन्सची डोकेदुखी वाढताना दिसत आहे.


मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जून तेंडूलकर याला कुत्रा चावला असल्याची बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे अर्जूनने स्वत: याबाबत माहिती दिली आहे. लखनौ येथे ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. लखनौ सुपर जायंट्सच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओत अर्जून स्वत: याबाबत माहिती देताना दिसत आहे. यात तो त्याच्या हाताच्या बोटाला कुत्रा चावल्याचे सांगत आहे. मात्र कोणता कुत्रा चावला याबाबत त्याने कोणतीही माहिती या व्हिडिओत दिलेली नाही.



लखनौ सुपर जायंट्सचा संघ हा लखनौमधील ताज हॉटेल येथे थांबला आहे. तसेच त्यांनी तेथील अटल बिहारी वाजपेयी स्टेडियममध्ये सराव देखील केला. मुंबई इंडियन्सचा संघ देखील याच ठिकाणी थांबला असून याच ठिकाणी अर्जूनला कुत्रा चावल्याची शक्यता वर्तवली जात आहे. लखनौ जायंट्सने ट्विट केलेल्या व्हिडिओवर चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच अनेक प्रश्न देखील विचारले आहेत. यात कुत्रा कुठे चावला? चावणारा कुत्रा हा कोणत्या प्रजातीचा होता? असे प्रश्न युजर्सकडून विचारले जात आहेत. दरम्यान, आज लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स खेळल्या जाणाऱ्या सामन्यात अर्जून तेंडूलकर खेळणार की नाही, याबाबत कोणहीती माहिती समोर आलेली नाही.

logo
marathi.freepressjournal.in