मुंबई : चार बंगला, अंधेरी पश्चिम येथील नवकिरण मंडळातर्फे कला, क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गेली ४८ वर्षे विविध सामाजिक उपक्रम राबवत असलेल्या या मंडळातर्फे २० डिसेंबर रोजी शरीरसौष्ठव स्पर्धा भरवण्यात येईल. २३ डिसेंबर रोजी नृत्य स्पर्धा होणार असून यासाठी राष्ट्रीय एकात्मता, देशप्रेम, पारंपरिक लोकनृत्य हे विषय बंधनकारक असतील. २३ व २४ डिसेंबर रोजी आंबोलीतील हेलन गार्डनमध्ये सर्कल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व स्पर्धांमध्ये नाव नोंदवण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी ९८२०३७२८०२ या क्रमांकावर संपर्क साधावा.