आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स राज्य अजिंक्यपद स्पर्धा:मुंबई शहरच्या मुली अजिंक्य

या स्पर्धेत एकूण १६ जिल्ह्यांतील संघांनी सहभाग नोंदवला होता. १० वर्षांखालील मुलींच्या गटात काव्या चौधरीने १ सुवर्ण, ३ रौप्यपदकांची कमाई केली
आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स राज्य अजिंक्यपद स्पर्धा:मुंबई शहरच्या मुली अजिंक्य

मुंबई : डेरवण, रत्नागिरी येथे आयोजित ५७व्या आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स राज्य अजिंक्यपद स्पर्धेत मुंबई शहर संघाने मुलींच्या दोन्ही गटांत (१० व १२ वर्षांखालील) विजेतेपद मिळवले.

या स्पर्धेत एकूण १६ जिल्ह्यांतील संघांनी सहभाग नोंदवला होता. १० वर्षांखालील मुलींच्या गटात काव्या चौधरीने १ सुवर्ण, ३ रौप्यपदकांची कमाई केली. सई कबदुळे व शनया पारेख यांनी प्रत्येकी १ रौप्यपदक जिंकले. १२ वर्षांखालील मुलींच्या गटात धनिष्ठा उगलमुळेने १ सुवर्ण, २ कांस्य, पहेल शाहने २ रौप्य, तर मानुषी करवतने १ रौप्यपदक प्राप्त करून मुंबईच्या विजयात मोलाचे योगदान दिले. या संघाचे प्रशिक्षक म्हणून अतुल साठे यांचे खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन लाभले.

logo
marathi.freepressjournal.in