आर्टिस्टिक्स जिमनॅस्टिक्स राज्य अजिंक्यपद; स्पर्धेत मुलींच्या गटात मुंबई सिटी संघाला दुहेरी मुकट                              

या संघाचे प्रशिक्षक म्हणून अतुल साठे यांचे खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन लाभले. तर व्यवस्थापक म्हणून सायली उतेकर हिच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली होती.
आर्टिस्टिक्स जिमनॅस्टिक्स राज्य अजिंक्यपद; स्पर्धेत मुलींच्या गटात मुंबई सिटी संघाला दुहेरी मुकट                              
PM
Published on

मुंबई : डेरवण, रत्नागिरी येथे आयोजित ५७ व्या मिनी सब ज्युनियर  गटाच्या  आर्टिस्टिक जिमनॅस्टिक्स राज्य अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्या दिवशी मुंबई सिटी संघाने मुलींच्या दोन्ही गटाची सांघिक विजेतेपदे पटकावून दुहेरी मुकुटात मान पटकावला. या स्पर्धेत एकूण १६ जिल्हा सघानी सहभाग घेतला आहे. यामधे साई सेंटरचा देखील सहभाग होता. १० वर्षा खालील मुलींच्या गटात काव्या चौधरी १ सुवर्ण, ३ रौप्य, सई कबदुळे व शनया पारेख यांनी १-१ रौप्य पदक प्राप्त केले. १२ वर्षा खालील मुलींच्या गटात देखील धनिष्ठा उगलमुळे १ सुवर्ण, २ कांस्य पहेल शाह २ रौप्य व मानुषी करवतने १ रौप्य पदक जिंकून मुंबई सिटीच्या यशात मोठा वाटा उचलला. मुंबई सिटी असोशिएशनचे अध्यक्ष संजय शेटे सचिव डी. डी.शिंदे, कोषाध्यक्ष डॉ. राजेंद्र शेळके प्राचार्य डॉ. जी. के. ढोकरट, सर्व पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे  खास  अभिनंदन केले . या संघाचे प्रशिक्षक म्हणून अतुल साठे यांचे खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन लाभले. तर व्यवस्थापक म्हणून सायली उतेकर हिच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली होती.

१० वर्षा खालील मुली विजेते

१. मुंबई शहर, २. मुंबई उपनगर, ३. पुणे

 १२ वर्षा खालील मुली विजेते

१. मुंबई शहर, २. मुंबई उपनगर, ३. पुणे

 मुंबई सिटीचे विजेते संघ

१० वर्षा खालील मुली

१.काव्या  चौधरी २. शनया पारेख ३. सई कबदुले ४. मायरा श्रीवास्तव

 १२वर्षा खालील मुली

१. पहेल शाह २. मानुषी करवत ३. धनिष्ठा उगलमुगले ४. नकिया मर्चंट ५. रिया ठसाळे

logo
marathi.freepressjournal.in