Ashes Test: ऑस्ट्रेलियाचे दुसऱ्या कसोटीवरही वर्चस्व

मायकल नेसरने दुसऱ्या डावात मिळवलेल्या पाच बळींच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात २४१ धावांत गुंडाळले. मग कर्णधार स्टीव्ह स्मिथ (नाबाद २३) व अन्य फलंदाजांनी १० षटकांत ६५ धावांचे लक्ष्य गाठले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा ८ गडी राखून पराभव केला. याबरोबरच त्यांनी पाच लढतींच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.
ऑस्ट्रेलियाचे दुसऱ्या कसोटीवरही वर्चस्व
ऑस्ट्रेलियाचे दुसऱ्या कसोटीवरही वर्चस्व(संग्रहित छायाचित्र)
Published on

ब्रिस्बेन : मायकल नेसरने दुसऱ्या डावात मिळवलेल्या पाच बळींच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात २४१ धावांत गुंडाळले. मग कर्णधार स्टीव्ह स्मिथ (नाबाद २३) व अन्य फलंदाजांनी १० षटकांत ६५ धावांचे लक्ष्य गाठले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा ८ गडी राखून पराभव केला. याबरोबरच त्यांनी पाच लढतींच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.

ब्रिस्बेन (गॅबा) येथे सुरू असलेल्या या कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ७३ षटकांत ६ बाद ३७८ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे इंग्लंडच्या पहिल्या डावातील ३३४ धावांच्या प्रत्युत्तरात ते सध्या ४४ धावांनी आघाडीवर आहेत. दिवसअखेर यष्टिरक्षक ॲलेक्स कॅरी ४६, तर मायकल नेसर १५ धावांवर नाबाद आहे. तसेच कॅमेरून ग्रीन (४५), ट्रेव्हिस हेड (३३) यांनीही चांगले योगदान दिले. इंग्लंडसाठी ब्रेडन कार्सने ३, तर कर्णधार बेन स्टोक्सने २ बळी मिळवले आहेत. ऑस्ट्रेलियाने प्रत्येक षटकामागे पाचच्या रनरेटने धावा करतानाच इंग्लंडच्या गोलंदाजांना घाम गाळायला लावत संपूर्ण दिवसावर वर्चस्व गाजवले.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिका सुरू असून उभय संघांतील पहिली कसोटी ऑस्ट्रेलियाने जिंकली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया मालिकेत १-० अशी आघाडीवर असून ४ डिसेंबरपासून ब्रिस्बेन येथे गुलाबी चेंडूने प्रकाशझोतात दुसरी कसोटी खेळवण्यात येत आहे. १८८२-८३ पासून ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यात खेळवण्यात येणाऱ्या कसोटी मालिकेस ॲशेस असे संबोधले जाते.

२०२३मध्ये इंग्लंड येथे अखेरची ॲशेस मालिका झाली होती. त्यामध्ये दोन्ही संघांना २-२ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. त्यामुळे तूर्तास ऑस्ट्रेलियाकडे ॲशेस करंडक आहे. कारण २०२१-२२मध्ये त्यांनी मायदेशात ही मालिका जिंकली होती. आता चार वर्षांनी पुन्हा एकदा कांगारूंना मायदेशात ॲशेसवरील वर्चस्व अबाधित राखण्याची संधी आहे. उभय संघांत १७ डिसेंबरपासून ॲडलेडला तिसरी, २६ डिसेंबरपासून मेलबर्नला चौथी, तर ४ जानेवारीपासून सिडनीला पाचवी कसोटी खेळवण्यात येईल.

तत्पूर्वी, गुरुवारच्या ९ बाद ३२५ धावांवरून पुढे खेळताना इंग्लंडचा शेवटचा बळी शुक्रवारी तिसऱ्याच षटकात बाद झाला. ब्रेंडन डॉगेटने जोफ्रा आर्चरला बाद करून त्यांचा डाव ३३४ धावांत संपुष्टात आणला. मात्र आर्चरने ३२ चेंडूंत ३८ धावा फटकावतानाच जो रूटसह शेवटच्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी रचली. रूट १३८ धावांवर नाबाद राहिला. मिचेल स्टार्कने ६ बळी मिळवले. लढतीचा तिसरा दिवस कोणत्या संघाच्या बाजूने झुकणार, याकडे आता सर्वांचे लक्ष असेल.

संक्षिप्त धावफलक

इंग्लंड (पहिला डाव) : ३३४

ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ५११

इंग्लंड (दुसरा डाव) : २४१

ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) : १० षटकांत २ बाद ६९

logo
marathi.freepressjournal.in