Asia Cup 2025 : पुन्हा भारत-पाकिस्तान लढत; सुपर-४ फेरीचा सामना आज

आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. सुपर-४ फेरीत रविवारी भारत-पाक यांच्यात क्रिकेटच्या मैदानातील द्वंद्व चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव हा पुन्हा एकदा फिरकी त्रिकुटावर अवलंबून राहणार आहे.
Asia Cup 2025 : पुन्हा भारत-पाकिस्तान लढत; सुपर-४ फेरीचा सामना आज
Published on

दुबई: आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. सुपर-४ फेरीत रविवारी भारत-पाक यांच्यात क्रिकेटच्या मैदानातील द्वंद्व चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव हा पुन्हा एकदा फिरकी त्रिकुटावर अवलंबून राहणार आहे.

आशिया चषक स्पर्धेत गत रविवारी झालेल्या लढतीत भारताने पाकिस्तानला धूळ चारली. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंसोबत हात मिळवण्यास नकार दिला. त्यामुळे या सामन्याची प्रचंड चर्चा झाली होती.

रविवारी होणाऱ्या लढतीतही भारतीय खेळाडू पाकिस्तानच्या संघासोबत हात मिळवणार नसल्याचे समजते.

कर्णधार सूर्यकुमारने या स्पर्धेत शानदार कामगिरी केली आहे. कर्णधार आणि फलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर त्याने आपले नाणे खणखणीत वाजवले आहे.

ओमानविरुद्धच्या लढतीत झेल टिपताना अष्टपैलू अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यामुळे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे काहीसे चिंतेत होते. मात्र क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप यांनी अक्षर व्यवस्थित असल्याचे सांगितल्याने ही चिंता दूर झाली आहे.

पाकिस्तानच्या लढतीआधी सूर्यकुमारने संघातील प्रयोग करून पाहिले. ओमानविरुद्धच्या लढतीत ४३ वर्षीय आमिर कलिम आणि हम्मद मिर्झा यांनी हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग या दुकलीला चोपले.

पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रित बुमरा संघात असेल. त्याच्या पुनरागमनाने संघातील गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढेल. बुमरासह वरुण चक्रवर्तीलाही संघात स्थान मिळेल. या दोन्ही खेळाडूंना ओमानविरुद्धच्या लढतीत विश्रांती दिली होती.

भारताच्या तुलनेत पाकिस्तानचा संघ अगदीच कमजोर वाटतो. गुणवान संघात खेळाडूंची वानवा आहे. फिरकी गोल दाजांना ओळखण्याची क्षमता त्य ांच्य फलंदाजांमध्ये नसल्याचे दिसते. T

पाकिस्तानच्या संघात जावेद मियादाद, इंझमाम उल हक, सलिम मलिक यांसारखे तंत्रशुद्ध फलंदाज होऊन गेले. पण सध्याच्या संघातील फलंदाजांमध्ये त्याची कमतरता आहे.

डावखुला सलामीवीर सैम आयुबने सलग दुसऱ्या सामन्यात भोपळाही फोडलेला नाही.

फिरकीवर मदार

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करते. त्यामुळे कुलदीप यादव (आतापर्यंत स्पर्धेत ८ विकेट मिळवल्या आहेत). अक्षर आणि वरुण ही तिकडी भारतासाठी फायदेशीर ठरू शकते. जर का अक्षर अनफिट असेल तर वॉशिंग्टन सुंदर आणि रियान पराग यांच्यापैकी एकाला संघात संधी मिळू शकते. मात्र तशी शक्यता फारच कमी आहे.

अँडी पायक्रॉफ्ट हेच सामनाधिकारी?

दुबई : पाकिस्तानच्या विनंतीनंतरही आयसीसीने रविवारी होणाऱ्या आयसीसी सुपर ४ मधील भारत-पाक हायव्होल्टेज लढतीसाठी अॅडी पायक्रॉफ्ट यांची सामनाधिकारी म्हणून नियुक्ती केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भारत-पाक यांच्यातील रविवारच्या लढतीसाठी अॅडी पायक्रॉफ्ट हेच मॅच रेफरी असतील, असे एका विश्वसनीय सूत्राने वृत्तसंस्थेला सांगितले. रविवारच्या सामन्यातील अधिकाऱ्यांनी नावे जाहीर करण्यात आलेली नाही. पायक्रॉफ्ट हे भारत-पाकिस्तान यांच्यातील गत सामन्यात मॅच रेफरी होते. त्या सामन्यात हस्तांदोलनावरून वाद निर्माण झाला होता. दरम्यान सामन्याआधी दोन्ही संघांच्या कर्णधाराची पत्रकार परिषद होणार होती. पण पाकिस्तानने या पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकला असल्याचे समजते.

काही गोष्टी सांगणे आणि करणे यात फरक - सूर्यकुमार यादव

  • हॉटेलच्या रूमचा दरवाजा बंद करणे, मोबाईल बंद करणे आणि झोपणे हे मोठ्या सामन्यापूर्वी बाहेरील दबाव टाळण्यासाठी योग्य असते; पण काही गोष्टी सांगणे आणि करणे यात फरक असल्याचे मत भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने व्यक्त केले.

  • दबाव टाळण्यासाठी तुमच्या रूमचा दरवाजा बंद करा, फोन बंद करा आणि झोपा हेच सर्वोत्तम आहे. हे सांगायला सोपे आहे, पण कधी कधी असे वागणे कठीण असते. कारण तुम्हाला अनेक मित्र भेटतात, बाहेर जेवायला जातात. त्यामुळे ते अशक्य असते, असे सूर्यकुमार म्हणाला.

  • बाहेरील आवाज पूर्णपणे बंद करणे शक्य नाही. मात्र त्यातील काही चांगल्या गोष्टी निवडून घेता येतात. काय ऐकायचे आहे, काय मनात ठेवायचे आहे हे तुमच्यावर आहे, असे सूर्या म्हणाला.

  • भारतीय संघाची तयारी चांगली झाली आहे. स्पर्धेत आतापर्यंत भारताने ३ सामने जिंकले आहेत. आम्हाला काय करायचे आहे यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे, असे सूर्या म्हणाला. पाकिस्तान विरुद्धच्या लढतीत टॉसचा विशेष फायदा होणार नाही, असे सूर्याला वाटते.

आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे संघ २० वेळा आमनेसामने आले आहेत. त्यातील ११ सामन्यांत भारताने बाजी मारली आहे. पाकिस्तानने ६ सामने जिंकले आहेत. ३ सामने अनिर्णित राहिले आहेत.

सामन्यांत भारताने गेल्या १४ टी-२० वर्चस्व गाजवले आहे. या १४ सामन्यांत भारतीय संघाने १० सामने खिशात घातले आहेत, तर ३ सामने गमावले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in