Asian Games 2023 : भारतीय पुरुष कबड्डी संघाने पटकावलं सुवर्णपदक ; इराण संघाचा पराभव करत रचला इतिहास

भारतीय संघाने अंतिम सामन्यात इराणचा ३३-२९ असा पराभव करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
Asian Games 2023 : भारतीय पुरुष कबड्डी संघाने पटकावलं सुवर्णपदक ; इराण संघाचा पराभव करत रचला इतिहास

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष कबड्डी संघाने अंतिम फेरीत इराणचा परभव करत सुवर्णपदक पटकावलं आहे.यामुळे भारतीयांच्या शिरात आणखी एक मानचा तुरा रोवला गेला आहे. भारतीय संघाने अंतिम सामन्यात इराणचा ३३-२९ असा पराभव करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. हा सामाना अतिशय रोमांचक असा झाला. यंदाचा आशिया स्पर्धेतील कबड्डीचा सामना जिंकत भारताने गतविजेत्या इराणचा पराभव करुन आपल्या नावावर करुन घेतला आहे.

या सामान्यादरम्यान काहीसा वाद झाल्याने सामन्याला विलंब झाला. पण शेवटी हा निर्णय हा भारताच्या बाजून देण्यात आला. तासाभराच्या वादानंतर खेळ पुन्हा सुरु करण्यात आला. भारताने इराणचा पराभव करत आणखी एक सुवर्णपदक आपल्या नावावर केलं आहे. दरम्यान, भारतीय खेळाडूंची आशियाई स्पर्धेत पदकं मिळवण्याची घोडदौड सुरुच आहे.

भारतात पारंपारिक स्पतिस्पर्धी अरसेल्या पाकिस्थानी संघाला हरवत उपांत्य फेरीत विजय मिळवला. भाकिस्तानला चारी मुंड्या चित करत भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला. महिला कबड्डीच्या उपांत्य फेरीत भारताने नेपाळच्या संघावर दणदणीत विजय मिळवला आहे. भारतीय महिला संघाने ६१-१७ असा सरळ विजय मिळवून अंतिम फेरीत आपलं स्थान पक्क केलं आहे.

आशियाई स्पर्धा २०२३मध्ये भारतीय महिला कबड्डी संघाने शानदार कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावलं आहे. चीनचा पराभव करत भारताच्या नारी शक्तीचं सुवर्ण पदकावर नाव कोरलं आहे.चिनी तैपेईचा चित्तथरारक अंतिम फेरीत पराभव करत भारतीय महिला कबड्डी संघाने भारताला २७ वं सुवर्ण पदक मिळवून दिलं आहे.

पदकांचं शकत पार

यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. भारताच्या खात्यात आतापर्यंत १०४ पदकं सामील झाली आहेत. यात २८ सुवर्ण, ३५ रौप्य आणि ४१ कास्य पदकांचा समावेश आहे. पदकतालिकेत भारत चौथ्या स्थानावर असून आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने शकत पार केल्याची ही पहिलीच वेळ आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in