Asian Games 2023 : भारतीय हॉकी संघाने सुर्वणपदकासह पटकावलं पॅरिस ऑलिम्पिकचं तिकीट ; शतकांचं शतक केलं पार

या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत २१ सुवर्ण ३३ रौप्य व ३७ कास्य अशी एकून ९१ पदकं जिंकली आहेत. तसंच ९ पदकं निश्चित केली आहेत.
Asian Games 2023 : भारतीय हॉकी संघाने सुर्वणपदकासह पटकावलं पॅरिस ऑलिम्पिकचं तिकीट ; शतकांचं शतक केलं पार

आशियाई स्पर्धा २०२३ भारतीय खेळाडूंनी चांगलीच गाजवली असल्याचं दिसून येत आहे. यंदाच्या आशियाने स्पर्धेत भारतीय केळाडूंनी चमकदार कामगिरी केल्याचं दिसून येत आहे. भारतीय खेळाडूंनी पहिल्यादाच पदकांचं शकत पार केलं आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत २१ सुवर्ण ३३ रौप्य व ३७ कास्य अशी एकून ९१ पदकं जिंकली आहेत. तसंच ९ पदकं निश्चित केली आहेत. आज झालेल्या तिरंदाजीत भारताला पुरष रिकव्हर् गटाचं रौप्यपदक मिळां. कुस्तीत कांस्यपदकाची कमाई केली. हॉकी फायनलमध्ये भारतीय पुरष संघावर आज सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. कारण या स्पर्धेत भारतात सुवर्णपदकासह पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट देखील जिंकण्याची संधी भारतात होती. यात भारतीय हॉकी संघाला आव्हान द्यायला गतविजेता जपानचे आव्हान होते. भारतीय हॉकीच्या पुरुष संघाने या आव्हान सहज पार करत तब्बल ९ वर्षांनी सुवर्णपदक जिकंलं आणि ऑलिम्पिक पात्रताही निश्चित केली.

भारतीय हॉकी संघाने ९५८ साली ८-० च्या फरकाने जपानला नमवलं होतं. आणि २०१८च्या आशियाई स्पर्धेत त्याची पुनरावृत्ती झाली. भारतीय पुरुष संघाने १९६६, १९९८ आणि २०१४ साली सुवर्णपदक पटकावलं आहे. गेल्या वर्षीच्या स्पर्धेत भारतात कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं. फायनलमध्ये पाचव्या मिनिटाला भारतीय खेळाडू गोल करण्याच्या अगदी जवळ पोहचले. परंतु थोडक्यात हुलकावणी दिली. पहिल्या क्वार्टरमध्ये जपानचा बचाव मजबूत राहिला. भारतीय संघाने शेवटच्या १ मिनिटाला गोल केला परंतु रेफरीच्या शीटी वाजल्यानंतर तो प्रयत्न झाल्याने तो ग्राह्य धरण्यात आला नाही. मात्र, भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला.

दुसऱ्या क्वार्टरमध्ये मनप्रीत सिंगने सर्कलमधून रिव्हर्स फटका मारुन केलेल्या गोलने जपानच्या गोलरक्षकाला हतबल केलं आणि भारताने आघाडी घेतली. जापानने पलटवार केला. मात्र भारतीय गोलरक्षकाने अप्रतिम बचाव केला. यावेळी भारताने पहिल्या हाफमध्ये १-० अशी आघाडी घेतली. ३२ व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नर आणखी एक गोल करुन जपानला पूर्णपणे बॅकफूटवर फेकलं.

आशियाई स्पर्धांच्या इतिहासात जपानला एकदाही भारताव विजय मिळवता आलेला नाही. आज देखील याचाचं प्रत्येय आला. अभिषेकने ४८ व्या मिनिटाला सर्कलमधून अचूक गोल करुन भारताची आघाडी ४-० अशी मजबूत केली.

सामना संपायला अवघे १० मिनिटं शिल्लक असताना जपानकडून सरेन टनाकाने गोल केला. शेवटच्या मिनिटाला हरमनप्रीतने आणखी एक पेनल्टी कॉर्नर गोल करुन भारचाचा ५-१ असा विजय पक्का केला.

logo
marathi.freepressjournal.in