आशियाई ऑलिम्पिक परिषदेचे २०२३ मध्ये आयोजन

चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने आशियाई खेळ स्थगित केल्याची घोषणा ६ मे रोजी करण्यात आली होती
आशियाई ऑलिम्पिक परिषदेचे २०२३ मध्ये आयोजन

स्थगित आशियाई खेळांचे आता २०२३ मध्ये आयोजन करण्यात येणार असून २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबरदरम्यान सामने होणार आहेत. आशियाई ऑलिम्पिक परिषदेने (ओसीए) मंगळवारी याबाबतची घोषणा केली.

आशियाई खेळांच्या १९व्या सत्राचे आयोजन या वर्षी १० ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार होते; परंतु चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने आशियाई खेळ स्थगित केल्याची घोषणा ६ मे रोजी करण्यात आली होती.

ओसीएने स्पष्ट केले की, गेल्या दोन महिन्यांत चीन ऑलिम्पिक समिती (सीओसी), हांग्जो आशियाई खेळ आयोजन समिती (एचएजीओसी) आणि अन्य समित्या यांनी आशियाई खेळांसाठी योग्य तारखा निश्चित करण्यासाठी सविस्तर आढावा घेतला. अन्य आंतरराष्ट्रीय खेळांच्या तारखांपेक्षा वेगळ्या तारखा निश्चित करण्यात आल्या.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in