आशियाई कुस्ती स्पर्धा: राज्यातील ११ कुस्तीपटू भारतीय संघात

Asian Wrestling Championships: थायलंड येथे येत्या २६ जुलै रोजी १५ आणि २० वर्षांखालील होणाऱ्या आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात महाराष्ट्रातील ११ मल्लांची निवड झाली आहे.
आशियाई कुस्ती स्पर्धा: राज्यातील ११ कुस्तीपटू भारतीय संघात
ANI
Published on

रामभाऊ जगताप/कराड

थायलंड येथे येत्या २६ जुलै रोजी १५ आणि २० वर्षांखालील होणाऱ्या आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात महाराष्ट्रातील ११ मल्लांची निवड झाली आहे. यामध्ये २० वर्षाखालील ५९ किलो महिला गटामध्ये साताऱ्यातील प्रगती गायकवाड हिचाही समावेश आहे.

आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतीय कुस्ती महासंघाच्यावतीने दिल्ली (नोएडा) येथे निवड चाचणी घेण्यात आली होती. या निवड चाचणीत ग्रीकोरोमन आणि फ्रीस्टाईल प्रकारात १५ वर्षे आणि २० वर्षे खालील मल्लांनी विविध वजनगटात दमदार कामगिरी करून भारतीय कुस्ती संघातील आपले स्थान निश्चित केले आहे.

निवड झालेले मल्ल पुढीलप्रमाणे : ४४ किलो (१५ वर्षांखालील फ्रीस्टाइल) यश कामन्ना, ४१ किलो (१५ वर्षांखालील ग्रीकोरोमन) साईनाथ पारधी, ५२ किलो (१५ वर्षाखालील ग्रीकोरोमन) आदर्श पाटील, ३३ किलो, (१५ वर्षांखालील महिला), कस्तुरी कदम ३९ किलो (१५ वर्षांखालील महिला), ऋतुजा गुरव ४६ किलो (१५ वर्षांखालील महिला), आयुष्का गादेकर ५८ किलो (१५ वर्षांखालील महिला), धनश्री फंड ५५ किलो (२० वर्षांखालील महिला), प्रगती गायकवाड ५९ किलो (२० वर्षांखालील महिला), अमृता पुजारी ७२ किलो (२० वर्षांखालील महिला) यांची निवड झाली आहे.

यशस्वी मल्लांचे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी खा.रामदास तडस, उपाध्यक्ष व हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ, कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, सरचिटणीस हिंदकेसरी योगेश दोडके, हनुमंत गावडे, विलास कथुरे, संजय तीरथकर, प्रशिक्षक, पालक यांनी अभिनंदन केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in