कोलंबो : डावखुरा अनुभवी फलंदाज चरिथ असलंकाकडे श्रीलंकेच्या एकदिवसीय संघाचेही कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. असलंकानेच भारताविरुद्ध टी-२० मालिकेत नेतृत्व केले.
भारत-श्रीलंका यांच्यात २ ऑगस्टपासून ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे. या मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर करण्यात आला आहे. जनिथ लियांगे आणि निशान मदुष्का यांचे एकदिवसीय संघात पुनरागमन झाले आहे.
एकदिवसीय मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ
चरिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुशल मेंडिस, सदीरा समरविक्रमा, कामिंदू मेंडिस, जनिथ लियांगे, निशान मदुष्का, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेल्लालागे, चमिका करुणारत्ने, महीष थिक्षणा, अकिला धनंजया, दिलशान मदुशंका, मथीशा पाथिराना, असिता फर्नांडो.