अॅथलीट्स संघाचे नेतृत्व नीरज चोप्रा करणार

३७पैकी १८ महिला खेळाडू असून यामध्ये हिमा दास, द्युती चंद या धावपटूंचाही समावेश आहे.
अॅथलीट्स संघाचे नेतृत्व नीरज चोप्रा करणार

बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी (कॉमनवेल्थ गेम्स) भारताच्या ३७ अॅथलीट्सचा संघ गुरुवारी जाहीर करण्यात आला. या संघाचे नेतृत्व टोक्यो ऑलिम्पिक सुवर्णपदकविजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा करणार असून संघातील काही खेळाडू तंदुरुस्तीच्या आधारे स्पर्धेत खेळायचे की नाही, हे ठरवतील.

३७पैकी १८ महिला खेळाडू असून यामध्ये हिमा दास, द्युती चंद या धावपटूंचाही समावेश आहे. भारतीय अॅथलेटिक्स महासंघाचे (एएफआय) अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी भारतीय संघाची निवड केली. २८ जुलै ते ८ ऑगस्टदरम्यान राष्ट्रकुल स्पर्धा रंगणार आहे. यामध्ये एकूण ७२ देशांतील ५ हजारांपेक्षा अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. भारतीय संघात महाराष्ट्राचा स्टीपलचेसपटू अविनाश साबळे, ज्योती याराजी यांचाही समावेश आहे. “टोक्यो ऑलिम्पिकमधील नीरजच्या यशानंतर त्याच्याकडून साहजिकच संपूर्ण देशवासियांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेतही तो भारताचे नेतृत्व करणार असून आपल्या ताफ्यात एकापेक्षा एक प्रतिभावान खेळाडू असल्याने भारत अॅथलेटिक्समध्ये अधिकाधिक पदकांची कमाई करेल, अशी आशा आहे,” असे आदिल सुमारीवाला म्हणाले.

भारतीय संघ

पुरुष : नीरज चोप्रा, नितेंदर रावत, एम. श्रीशंकर, मोहम्मद अनीस, अब्दुल्ला अबूकर, प्रवीण चित्रावेल, एडलहाऊस पॉल, तजिंदरपाल सिंग तूर, रोहित यादव, संदीप कुमार, अमित खत्री, अरोकिया राजीव, मोहम्मद अजमल, नागनाथमन पंडी, राजेश रमेश, नोह निर्मल तोम, डीपी मनू.

महिला : एस. धनलक्ष्मी, ज्योती याराजी, ऐश्वर्या मिश्रा, अॅन्सी सोजन, मनप्रीत कौर, अन्नू राणी, नवजीत कौर, सामी पुनिया, मंजू बाला सिंग, हिमा दास, द्युती चंद, श्रावणी नंदा, सरिता सिंग, शिल्पा राणी, प्रियंका गोस्वामी, एन. एस. सिम्मी.

logo
marathi.freepressjournal.in