AUS vs ENG : कमिन्स, हेझलवूड दुसऱ्या ॲशेस कसोटीलाही मुकणार; 'पिंक बॉल' टेस्टसाठी स्टीव्ह स्मिथकडेच नेतृत्व

पॅट कमिन्स आणि जोश हेझलूवड यांची अनुभवी वेगवान जोडी दुसऱ्या ॲशेस कसोटी सामन्यालाही मुकणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व स्टीव्ह स्मिथकडेच कायम राखण्यात आले आहे.
AUS vs ENG : कमिन्स, हेझलवूड दुसऱ्या ॲशेस कसोटीलाही मुकणार; 'पिंक बॉल' टेस्टसाठी स्टीव्ह स्मिथकडेच नेतृत्व
X | @mufaddal_vohra
Published on

सिडनी : पॅट कमिन्स आणि जोश हेझलूवड यांची अनुभवी वेगवान जोडी दुसऱ्या ॲशेस कसोटी सामन्यालाही मुकणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व स्टीव्ह स्मिथकडेच कायम राखण्यात आले आहे.

ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिका सुरू असून उभय संघांतील पहिली कसोटी ऑस्ट्रेलियाने जिंकली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया मालिकेत १-० अशी आघाडीवर असून आता ४ डिसेंबरपासून ब्रिस्बेन येथे दुसरी कसोटी खेळवण्यात येईल. ही कसोटी गुलाबी चेंडूने प्रकाशझोतात रंगणार आहे. त्यामुळे कमिन्स व हेझलवूड तोपर्यंत संघात परततील, असे अपेक्षित होते. मात्र ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाने शुक्रवारी पहिल्या कसोटीचाच १४ जणांचा संघ कायम राखला.

दुसरीकडे बेन स्टोक्सच्या नेतृत्वात खेळणाऱ्या इंग्लंडने मात्र दुसऱ्या कसोटीसाठी अद्याप संघ जाहीर केलेला नाही.

दरम्यान, ॲशेस कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याचा दुसऱ्या दिवशीच निकाल लागला. ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांनी दुसऱ्या डावातही केलेल्या चमकदार कामगिरीला ट्रॅव्हिस हेडच्या तुफानी शतकाची उत्तम साथ लाभली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ८ गडी राखून धुव्वा उडवत पाच लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

१८८२-८३ पासून ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यात खेळवण्यात येणाऱ्या कसोटी मालिकेस 'अॅशेस' असे संबोधले जाते.

२०२३मध्ये इंग्लंड येथे अखेरची अॅशेस मालिका झाली होती. त्यामध्ये दोन्ही संघांना २-२ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. त्यामुळे तूर्तास ऑस्ट्रेलियाकडे अॅशेस करंडक आहे. कारण २०२१-२२मध्ये त्यांनी मायदेशात ही मालिका जिंकली होती. आता चार वर्षांनी पुन्हा एकदा कांगारूंना मायदेशात अॅशेसवरील वर्चस्व अबाधित राखण्याची संधी आहे. पर्थ येथे पहिली कसोटी झाल्यावर ४ डिसेंबरपासून ब्रिस्बेन येथे दुसरी, १७ डिसेंबरपासून अॅडलेडला तिसरी, २६ डिसेंबरपासून मेलबर्नला चौथी, तर ४ जानेवारीपासून सिडनीला पाचवी कसोटी खेळवण्यात येईल.

logo
marathi.freepressjournal.in