दोन दिवसांतच कसोटीचा निकाल; ऑस्ट्रेलियाचे बांगलादेशवर डावाने वर्चस्व

वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने सामन्यात घेतलेल्या १० बळींच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटीत बांगलादेशचा एक डाव आणि ५१ धावांनी पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने दोन सामन्यांची ही मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली.
दोन दिवसांतच कसोटीचा निकाल; ऑस्ट्रेलियाचे बांगलादेशवर डावाने वर्चस्व
Published on

मकाय : वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने सामन्यात घेतलेल्या १० बळींच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटीत बांगलादेशचा एक डाव आणि ५१ धावांनी पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने दोन सामन्यांची ही मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. उत्तरेकडील क्वीन्सलँड राज्यातील मॅके येथील खेळपट्टीवर हा सामना अवघ्या दोन दिवसांत संपला.

पहिल्या डावात १२ धावांत ६ बळी घेणाऱ्या स्टार्कने रविवारी दुसऱ्या डावात ३९ धावा देत ४ बळी घेतले. अशाप्रकारे त्याने ५१ धावांत १० बळी घेण्याची कामगिरी केली. स्टार्कने कसोटी कारकीर्दीत चौथ्यांदा एका सामन्यात १० बळी घेण्याचा कारनामा केला आहे. यासह त्याच्या कसोटी बळींची संख्या ४४५ वर पोहोचली असून, त्याने दक्षिण आफ्रिकेचे महान गोलंदाज डेल स्टेन यांना मागे टाकत सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत १० वे स्थान मिळवले. दोन सामन्यांत १२ बळी घेणाऱ्या स्टार्कला मालिकावीर घोषित करण्यात आले.

ऑस्ट्रेलियाच्या २१० धावांच्या प्रत्युत्तरात दुसऱ्या डावात बांगलादेशचा संघ अवघ्या ९५ धावांत गारद झाला. पॅट कमिन्स आणि नॅथन लायन यांनी प्रत्येकी ३ बळी घेत स्टार्कला उत्तम साथ दिली. बांगलादेशकडून कर्णधार नजमुल हुसेन शांतोने सर्वाधिक ३१, तर मुशफिकुर रहीमने नाबाद २९ धावा केल्या.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in