ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेला गुंडाळले

ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसअखेर ३ बाद ९८ धावांपर्यंत मजल मारली.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेला गुंडाळले

अनुभवी फिरकीपटू नॅथन लायनने ९० धावांत पाच बळी पटकावल्यामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात श्रीलंकेचा पहिला डाव २१२ धावांत गुंडाळला. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसअखेर ३ बाद ९८ धावांपर्यंत मजल मारली.

गॉल येथे बुधवारपासून सुरू झालेल्या उभय संघांतील पहिल्या कसोटीत निरोशन डिकवेला (५८) वगळता श्रीलंकेचे अन्य फलंदाज फारशी झुंज देऊ न शकल्यामुळे त्यांचा पहिला डाव २१२ धावांत आटोपला. लेगस्पिनर मिचेल स्वेपसनने तीन बळी मिळवून लायनला उत्तम साथ दिली. लायनने कारकीर्दीत २०व्यांदा एकाच डावात पाच बळी पटकावण्याची किमया साधली.

त्यानंतर फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानेसुद्धा डेव्हिड वॉर्नर (२५) आणि मार्नस लबूशेन (१३) यांना स्वस्तात गमावले. रमेश मेंडिसने त्यांना बाद केले. तर भरवशाचा स्टीव्ह स्मिथ ६ धावांवर धावचीत झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का बसला. दिवसअखेर उस्मान ख्वाजा ४७, तर ट्रेव्हिस हेड ६ धावांवर खेळत असून ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात अद्याप ११४ धावांनी पिछाडीवर आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in