ऑस्ट्रेलियाचा विंडीजवर दणदणीत विजय; पहिल्या कसोटीत १५९ धावांनी बाजी

वेस्ट इंडिजला दुसऱ्या डावात अवघ्या १४१ धावांवर सर्वबाद करत ऑस्ट्रेलियाने मालिकेतील पहिला कसोटी सामना तिसऱ्या दिवशी १५९ धावांनी खिशात घातला. गोलंदाजांना अनुकूल अशा खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाने ३०१ धावांचे लक्ष्य वेस्ट इंडिजला दिले. मात्र यजमान संघ ३३.४ षटकांत १४१ धावांवर सर्वबाद झाला.
ऑस्ट्रेलियाचा विंडीजवर दणदणीत विजय; पहिल्या कसोटीत १५९ धावांनी बाजी
Published on

ब्रिजटाऊन : वेस्ट इंडिजला दुसऱ्या डावात अवघ्या १४१ धावांवर सर्वबाद करत ऑस्ट्रेलियाने मालिकेतील पहिला कसोटी सामना तिसऱ्या दिवशी १५९ धावांनी खिशात घातला. गोलंदाजांना अनुकूल अशा खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाने ३०१ धावांचे लक्ष्य वेस्ट इंडिजला दिले. मात्र यजमान संघ ३३.४ षटकांत १४१ धावांवर सर्वबाद झाला.

वेगवान गोलंदाज जोश हेझलवुडने वेस्ट इंडिडची फलंदाजी उद्ध्वस्त केली. त्याने १२ षटकांत ४३ धावा मोजत ५ फलंदाजांना माघारी धाडले. २७षटकांत ८६ धावांवर ८ फलंदाज बाद अशा संकटात वेस्ट इंडीडचा संघ सापडला होता. त्यानंतर दिवसाच्या शेवटच्या ७५ मिनिटांत ऑस्ट्रेलियाला विकेट मिळवण्यासाठी धडपड करावी लागली.

अष्टपैलू जस्टीन ग्रेव्हसने नाबाद ३८ धावा आणि दहाव्या क्रमांकाचा फलंदाज शमार जोसेफ (४४ धावा) या जोडगोळीने नवव्या विकेटसाठी ५५ धावांची मोठी भागिदारी केली. जोसेफने ४ षटकार लगावत त्याच्या कारकिर्दीतील सर्वाधिक धावांची खेळी खेळली.

दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने खराब सुरुवात केली होती. ९२ धावांवर त्यांचे ४ प्रमुख फलंदाज माघारी परतले होते. परंतु ट्रॅविस हेड, वेबस्टर, कॅरी यांनी अर्धशतके झळकावत ऑस्ट्रेलियाला ३१० धावा जमवून दिल्या. पहिल्या डावातील पिछाडी वगळता ऑस्ट्रेलियाने ३०० धावांची मजबूत आघाडी घेतली होती.

logo
marathi.freepressjournal.in