थरारक विजयासह ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत: रविवारी भारताशी जेतेपदासाठी गाठ; पाकिस्तान­चे स्वप्न उद्ध्वस्त

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ ४८.५ षटकांत १७९ धावांत गारद झाला
थरारक विजयासह ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत: रविवारी भारताशी जेतेपदासाठी गाठ; पाकिस्तान­चे स्वप्न उद्ध्वस्त
Published on

बेनोनी : अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर अवघी एक विकेट आणि ५ चेंडू राखून मात केली. या विजयासह ऑस्ट्रेलियाने युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. आता रविवारी भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ ४८.५ षटकांत १७९ धावांत गारद झाला. अझान अवैस व अराफत मिनहास यांनी प्रत्येकी ५२ धावा केल्या. टॉम स्ट्रॅकरने तब्बल ६ बळी मिळवले. लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून हॅरी डिक्सन (५०) व ओलीव्हर पिक (४९) यांनी उत्तम फलंदाजी केली. त्यामुळे एकवेळ ऑस्ट्रेलिया १ बाद ५० अशी सुस्थितीत होती. मात्र अली रझाने (३४ धावांत ४ बळी) केलेल्या भेदक माऱ्यापुढे त्यांची ९ बाद १६४ अशी अवस्था झाली. अखेर कॅलम विल्डर (नाबाद २) व रॅफ मॅकमिलन (नाबाद १९) या अखेरच्या जोडीने निर्णायक १७ धावा काढून कांगारूंचा विजय साकारला.

logo
marathi.freepressjournal.in