ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड टी-२० मालिका: झाम्पामुळे ऑस्ट्रेलियाची मालिकेत विजयी आघाडी

या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन लढतींच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.
ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड टी-२० मालिका: झाम्पामुळे ऑस्ट्रेलियाची मालिकेत विजयी आघाडी

ऑकलंड : लेगस्पिनर ॲडम झाम्पाने (३४ धावांत ४ बळी) केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा ७२ धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन लढतींच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ १९.५ षटकांत १७४ धावांत गारद झाला. लॉकी फर्ग्युसनने चार बळी मिळवले. ट्रेव्हिस हेड (४५) आणि पॅट कमिन्स (२८) यांनी कडवा प्रतिकार केला. मात्र स्टीव्ह स्मिथ (११), ग्लेन मॅक्सवेल (६), जोश इंग्लिस (५), मॅथ्यू वेड (१) यांनी निराशा केली.

लक्ष्याचा पाठलाग करताना मात्र न्यूझीलंडचा डाव १७ षटकांत १०२ धावांतच आटोपला. ग्लेन फिलिप्स (४२) वगळता कोणीही झुंज देऊ शकले नाही. फिन एलन (६), विल यंग (५), कर्णधार मिचेल सँटनर (७), मार्क चॅपमन (२) यांना अपयश आले. नॅथन एलिसने दोन, तर कमिन्स व जोश हेझलवूडने एक बळी मिळवून झाम्पाला उत्तम साथ दिली. कमिन्स सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in