
'वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप' स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघानं बाजी मारत आपलं नाव कोरलं आहे. इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात हा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाचा 209 धावांनी पराभव केला आहे. दुसऱ्या डावात 444 धावांचं आव्हान टीम इंडियापुढे होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना 234 धावांवर टीम इंडियाचा डाव आटपला. या सामन्यात भारताचे स्टार फलंदाज आपला करिश्मा दाखवण्यात अपयशी ठरले आहेत. भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी खराब फटकेबाजी करत आपल्या विकेट गमावल्या. त्यामुळे भारताला परभवाचा सामना करावा लागला. भारताचे आघाडीचे फलंदाज रोहिश शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रविंद्र जाडेजा आणि चेतेश्वर पुजारा यांना या सामन्यात मोठी खेळी करता आली नाही.
भारतीय संघाला पुन्हा एकदा जागतिक कसोटी विजेतेपदाच्या चषकावर आपलं नाव कोरण्यात अपयश आलं आहे. लंडनच्या ओव्हव मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघानं टीम इंडियाचा 209 धावांनी पराभव केला. या सामान्यात भारतीय संघापूढे 444 धावांचं आव्हान उभं केलं होतं. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी चौथ्या विकेटसाठी रचलेल्या 86 धावांच्या भागिदारीनं भारताच्या आव्हानात धुगधुगी कायम राखली होती. मात्र स्कॉट बोलँड याने विराट आणि जाडेजाला यांना माघारी पाठवून भारतीय संघाची पाच बाद 179 अशी अवस्था केली. यानंतर मिचेल स्टार्कनं अजिंक्य रहाणेला माघारी पाळवल्यानंतर उरली सुरली आशा देखील मावळली. अशात ऑस्ट्रेलियानं भारताचा डाव 234 धावांवर आटोपला आणि जागतिक कसोटी विजेतेपदाच्या चषकावर आपलं नाव कोरलं.
गेल्या दहा वर्षापासून भारतीय संघाचा आयसीसी चषक जिंकायचा दुष्काळ कायम राहिला आहे. या वेळी भारतीय संघाकडून मोठी आशा असताना या पराभवानं सर्वांचं स्वप्न भंगलं आहे. आजच्या सामन्यात झालेल्या विजयानंतर ऑस्ट्रेलिया संघानं आणखी एक आयसीसी ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. ऑस्ट्रेलिया हा आयसीसीच्या सर्व ट्रॉफी नावावर करणारा संघ ठरला आहे.