
केर्न्स येथील कॅजेली स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्धच्या वन-डे मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने २५ धावांनी विजय मिळविला. या सामन्यातील शतकवीर स्टिव्हन स्मिथला (१३१ चेंडूंत १०५) सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. मालिकेत त्याने १६७ धावा केल्याने मालिकावीराचाही मान त्याला मिळाला. ऑस्ट्रेलियाने मालिका ३-० ने जिंकली.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केले. ऑस्ट्रेलियाने निर्धारित ५० षट्कात ५ बाद २६७ धावा केल्या. विजयासाठी लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ ४९.५ षट्कांत २४२ धावांत गारद झाला.