ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा : बोपण्णा-एब्डन जोडी उपांत्यपूर्व फेरीत

बोपण्णा-एब्डन जोडीने जागतिक क्रमवारीतही दुसरे स्थान पटकावले
ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा : बोपण्णा-एब्डन जोडी उपांत्यपूर्व फेरीत

मेलबर्न : भारताचा पुरुष दुहेरीतील ४३ वर्षीय टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन साथीदार मॅथ्यू एब्डन यांनी सोमवारी ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. याबरोबरच बोपण्णा-एब्डन जोडीने जागतिक क्रमवारीतही दुसरे स्थान पटकावले. आता जर त्यांनी उपांत्य फेरीतही प्रवेश केला, तर स्पर्धेअखेरीस ते क्रमवारीत अग्रस्थानी येऊ शकतात.

शो कोर्ट एरिना येथे झालेल्या पुरुष दुहेरीच्या तिसऱ्या फेरीत बोपण्णा-एब्डन यांच्या दुसऱ्या मानांकित जोडीने वेस्ले कूलहोल्फ आणि निकोला मेक्टिक या १४व्या मानांकित जोडीला ७-६ (१०-८), ७-६ (७-४) असे सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले. मंगळवारी उपांत्यपूर्व फेरीत बोपण्णा-एब्डनसमोर मॅक्सिमो गोन्सालेझ आणि आंद्रे मोल्टेनी या अर्जेंटिनाच्या सहाव्या मानांकित जोडीचे कडवे आव्हान असेल. काही दिवसांपूर्वीच बोपण्णाने दुहेरी कारकीर्दीतील ५००वा विजय नोंदवला.

logo
marathi.freepressjournal.in