ऑस्ट्रेलियन ओपन : विजयासह जोकोव्हिचची विक्रमाला गवसणी; सर्वाधिक ग्रँड स्लॅम सामने खेळण्याची कामगिरी

नोवाक जोकोव्हिचने आपल्या विक्रमांच्या यादीत आणखी एका विक्रमाची भर घातली आहे.
ऑस्ट्रेलियन ओपन : विजयासह जोकोव्हिचची विक्रमाला गवसणी; सर्वाधिक ग्रँड स्लॅम सामने खेळण्याची कामगिरी
Published on

मेलबर्न : नोवाक जोकोव्हिचने आपल्या विक्रमांच्या यादीत आणखी एका विक्रमाची भर घातली आहे. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये बुधवारी जोकोव्हिचने रॉजर फेडररच्या सर्वाधिक ग्रँड स्लॅम सामने खेळण्याचा विक्रम मागे टाकला. जोकोव्हिचचा हा ४३० वा ग्रँड स्लॅम सामना होता. या सामन्यातील विजयासह जोकोव्हिचने स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

जोकोव्हिचने पोर्तुगीजच्या जेमी फारियाचा ६-१, ६-७ (४), ६-३, ६-२ अशी धूळ चारली. जोकोव्हिचची मोठ्या स्पर्धांमधील कारकिर्द ३७९-५१ अशी आहे.

ग्रँड स्लॅम हे या खेळातील मजबूत खांब आहेत. ते खेळातील सर्वस्व आहे. अर्थातच ही सर्वात महत्त्वाची स्पर्धा आहे. आणखी एका विक्रमाला गवसणी घातल्यामुळे मी आज खूप खूश असल्याचे जोकोव्हिच म्हणाला.

जोकोव्हिचने आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रम रचले आहेत. स्टार खेळाडू रॉजर फेडररने ४२९ ग्रँड स्लॅम सामने खेळले आहेत. त्याला आता जोकोव्हिचने मागे टाकले आहे.

सर्वाधिक ग्रँड स्लॅम एकेरीचे विजेतेपद पटकावण्याचा विक्रमही जोकोव्हिचच्या नावे आहे. त्याच्या खात्यात एकेरीचे २४ ग्रँड स्लॅम विजेतेपद आहेत. त्याच्यानंतर राफेल नदालच्या नावावर २२, तर फेडररच्या खात्यात २० ग्रँड स्लॅम आहेत. या तिघांमधील जोकोव्हिच वगळता उर्वरित दोन्ही खेळाडू निवृत्त झाले आहेत. क्रमवारीत सर्वाधिक आठवडे अव्वल स्थानी राहण्याचा विक्रमही जोकोव्हिचच्या नावावर आहे. त्याने ग्रँड स्लॅममध्ये ३७ वेळा अंतिम फेरी खेळल्या आहेत. फेडररच्या विक्रमापेक्षा हा आकडा सहाने पुढे आहे.

logo
marathi.freepressjournal.in