IND vs AUS : भारतासमोर आता ऑस्ट्रेलियाचे आव्हान, कसा असेल रोहित शर्माचा प्लेइंग 11 ?

रोहित शर्मासाठी संघ निवड सोपी नाही. यावेळीही कार्तिकऐवजी रोहित दिनेश ऋषभ पंतला संधी देणार?
IND vs  AUS : भारतासमोर आता ऑस्ट्रेलियाचे आव्हान, कसा असेल रोहित शर्माचा प्लेइंग 11 ?

आशिया कपनंतर टीम इंडियासमोर आता ऑस्ट्रेलियाचे आव्हान आहे. मंगळवारपासून तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होत आहे. पहिला सामना मोहालीत होणार आहे. टी-20 वर्ल्डकपच्या दृष्टीने टीम इंडियासाठी ही टी-20 मालिका खूप महत्त्वाची आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचे नेतृत्व करेल. 

पहिल्या सामन्याच्या प्लेइंग 11 मध्ये रोहित कोणाला संधी देणार? हा खरा प्रश्न आहे. रोहित शर्मासाठी संघ निवड सोपी नाही. यावेळीही कार्तिकऐवजी रोहित दिनेश ऋषभ पंतला संधी देणार? हे बघणे महत्वाचे ठरेल. रोहितने स्पष्ट केले की केएल राहुल हा टी-20 मध्ये टीम इंडियाचा सलामीवीर आहे. म्हणजेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात रोहित-राहुलची जोडी सलामीला येईल, त्यानंतर विराट कोहली येईल. मधल्या फळीची जबाबदारी सूर्यकुमार यादववर असेल. हार्दिक पांड्या हा अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात असेल.

जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल फिट आहेत. त्याचे संघात पुनरागमन निश्चित आहे. भुवनेश्वर कुमारने 2022 मध्ये T20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत, त्यामुळे त्याचे संघातील स्थान नक्की असेल. फिरकी गोलंदाजीत युझवेंद्र चहलला संधी मिळू शकते.

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-

रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहल

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in