दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचे श्रीलंकेला चोख प्रत्युत्तर

नवव्या षटकात धावफलकावर अवघ्या १२ धावा लागलेल्या असताना पथुम निस्सांका मिशेल स्टार्कच्या गोलंदाजीवर बाद झाला.
दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचे श्रीलंकेला चोख प्रत्युत्तर

दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी ऑस्ट्रेलियाला श्रीलंकेने चोख प्रत्युत्तर दिले. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा श्रीलंकेने आपल्या पहिल्या डावात २ गडी बाद १८४ धावा केल्या होत्या. कर्णधार दिमुथ करुणारत्ने (१६५ चेंडूंत ८६) आणि कुशल मेंडिस (१५२ चेंडूंत नाबाद ८४) यांनी दमदार धावसंख्या उभारण्यास हातभार लावला. कुशल मेंडिससोबत ॲन्जेलो मॅथ्यूज सहा धावांवर नाबाद आहे. श्रीलंका अद्यापही १८० धावांनी पिछाडीवर आहे.

श्रीलंकेच्या पहिल्या डावाची सुरूवात निराशाजनक झाली. नवव्या षटकात धावफलकावर अवघ्या १२ धावा लागलेल्या असताना पथुम निस्सांका मिशेल स्टार्कच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याचा झेल कॅमेरॉन ग्रीनने टिपला. त्यानंतर कर्णधार दिमुथ करुणारत्ने आणि कुशल मेंडिस यांनी १५२ धावांची भागीदारी केली. ५५ व्या षटकात दिमुथला मिशेल स्वेपसनने पायचीत केले. त्याआधी, ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३६४ धावांत संपुष्टात आला. मार्नस लाबुसचागनेने शतक झळकविल्यांनतर स्टिव्हन स्मिथने नाबाद १४५ धावा करीत ऑस्ट्रेलियाला आव्हानात्मक धावसं‌ख्या उभारून दिली. श्रीलंकेच्या प्रभात जयसूर्याने ११८ धावांच्या मोबदल्यात सहा बळी टिपले. कसून रजिथाने दोन विकेट्स मिळविले. रमेश मेंडिस आणि महेश थिकशानाने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. पहिल्या दिवशीच स्टीव्ह स्मिथने कठीण परिस्थितीत शतक झळकाविले होते. स्मिथच्या कसोटी कारकिर्दीतील हे २८ वे शतक ठरले. अशी कामगिरी करून त्याने शतकांच्या बाबतीत भारताच्या विराट कोहलीला मागे टाकले आहे. आता तो ‘फॅब-४’मध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा दुसरा खेळाडू ठरला.

स्मिथ आणि इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटच्या नावावर प्रत्येकी २८ शतकांची नोंद आहे. कोहलीची २७ आणि न्यूझीलंडच्या केन विल्यमसनची २४ शतके आहेत. विराटने २०१९ सालापासून क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात एकही शतक झळकावलेले नाही. कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर त्याने बांगलादेशविरुद्ध शेवटचे शतक झळकावले होते. २०१९ पासून विराटने १८ कसोटी सामन्यांतील ३२ डावांमध्ये २७च्या सरासरीने फक्त ८७२ धावा केल्या आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in