क्रिकेटमध्येही आझादी का अमृतमहोत्सव ; भारतीय महाराजा आणि वर्ल्ड जायंट्स आमनेसामने

१६ सप्टेंबर रोजी कोलकातामधील ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीसाठी बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली करणार
क्रिकेटमध्येही आझादी का अमृतमहोत्सव ;  भारतीय महाराजा आणि वर्ल्ड जायंट्स आमनेसामने

भारताच्या ७५व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सध्या देशभरात ‘आझादी का अमृतमहोत्सव’ जोरात सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर क्रिकेटमध्येही आता या उपक्रमा अंतर्गत विशेष सामना खेळवण्यात येणार आहे.

लेजंड्स लीग क्रिकेटचा (एलएलसी) दुसरा हंगाम १७ सप्टेंबरपासून चार संघांमध्ये खेळवण्यात येईल. मात्र या हंगामाचा शुभारंभ भारतीय महाराजा आणि आणि वर्ल्ड जायंट्स संघात विशेष सामना खेळवून होईल. १६ सप्टेंबर रोजी कोलकातामधील ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीसाठी बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली भारताचे तर इंग्लंडचा विश्वविजेता माजी कर्णधार ईआन मॉर्गन वर्ल्ड जायंट्स संघाचे नेतृत्व करणार आहे. भारताच्या ७५व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हा सामना खेळवण्यात येणार असल्याचे एलएलसीचे कमिशनर रवी शास्त्री यांनी सांगितले.

“जगभरातील १० देशांतील खेळाडू या सामन्यात खेळणार असून त्याच्या पुढील म्हणजेच १७ सप्टेंबरपासून चार संघांतील लेजंड्स लीग क्रिकेटला प्रारंभ होईल. भारताच्या ७५व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित या सामन्याचा आनंद लुटण्यासाठी सर्वांनी या,” असे शास्त्री म्हणाले.

प्रतिस्पर्धी संघ

भारतीय महाराजा : सौरव गांगुली (कर्णधार), वीरेंद्र सेहवाग, मोहम्मद कैफ, युसूफ पठाण, सुब्रम्हण्यम बद्रिनाथ, इरफान पठाण, पार्थिव पटेल, स्टुअर्ट बिन्नी, एस. श्रीशांत, हरभजन सिंग, नमन ओझा, अशोक दिंडा, प्रग्यान ओझा, अजय जडेजा, आरपी सिंग, जोगिंदर शर्मा.

वर्ल्ड जायंट्स : ईआन मॉर्गन (कर्णधार), लेंडल सिमन्स, हर्षल गिब्स, जॅक्स कॅलिस, सनथ जयसूर्या, मॅट प्रायर, नॅथन मॅकक्युलम, जाँटी ऱ्होड्स, मुथय्या मुरलीधरन, डेल स्टेन, हॅमिल्टन मसाकाझा, मश्रफी मोर्तझा, असगर अफगाण, मिचेल जॉन्सन, ब्रेट ली, केव्हिन ओब्रायन, दिनेश रामदिन.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in