
पाकिस्तानचा कर्णधार आणि स्टार क्रिकेटपटू बाबर आझम (Babar Azam) मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. नुकतेच त्याचे काही खासगी आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. बाबर आझमचे सहकारी खेळाडूंच्या मैत्रिणींसोबत अवैध संबंध असलयाचे दावा केला जात आहे. संबंधित महिलेने सांगितले की, बाबर आझमने पत्नी बनवण्याच्या बहाण्याने संबंध ठेवले, असा आरोप केला आहे. तर, तब्बल १० वर्षे लैंगिक शोषण केल्याचा दावा संबंधित मुलीने पत्रकार परिषद घेऊन केला आहे. तिने बाबर जमवर कडक कारवाई करण्याची मागणी पीसीबीकडे केली आहे. यामुळे क्रिकेट वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.
पाकिस्तानच्या माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार या पीडित महिलेने आरोप केले आहेत की, "लग्न करण्याच्या बहाण्याने बाबर आझमने १० वर्ष माझे लैंगिक शोषण केले. मी गरोदर राहिल्यानंतर मला मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकीदेखील दिली." असे गंभीर आरोप करण्यात आले. अद्याप, या सर्व प्रकरणावर बाबर आझमने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तिने पत्रकार परिषदेत पुढे माहिती देताना सांगितले की, "बाबर आणि मी एकच शाळेमध्ये शिक्षण घेत होतो. आम्ही एकच ठिकाणी राहत होतो." असा दावा तिने केला आहे.
तिने सांगितले की, "आम्ही कालांतराने लग्नाचा विचार करण्यास सुरुवात केली. आम्ही आमच्या कुटुंबियांना सांगितल्यानंतर त्यांनी नकार दिला. म्हणून आम्ही २०११मध्ये घरातून पळून गेलो. आपण कोर्टात लग्न करू, असे म्हणत आम्ही गुलबर्ग येथे भाड्याने राहिलो होतो. पण त्याने लग्न केलेच नाही. बाबरची २०१४ मध्ये राष्ट्रीय क्रिकेट संघात निवड झाली. त्यानंतर त्याच्या वागण्यात हळूहळू बदल होऊ लागला. २०१५ मध्ये मी बाबरला सांगितले की मी गर्भवती आहे. यावर त्यांची प्रतिक्रिया फारच विचित्र होती. त्याने माझे शारीरिक शोषण केले. बाबरसह त्याच्या काही मित्रांनीही गर्भपात करून घेतला. २०१७ मध्ये मी बाबरविरोधात नशिराबाद पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती."