Babar Azam video : बाबर आझमचे सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडीओ; पीसीबी काय कारवाई करणार?

पाकिस्तानचा स्टार फलंदाज आणि कर्णधार बाबर आझम (Babar Azam) पुन्हा एकदा मोठ्या वादामध्ये सापडला आहे.
Babar Azam video : बाबर आझमचे सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडीओ; पीसीबी काय कारवाई करणार?
Published on

पाकिस्तान संघाला मायदेशात एकदिवसीय आणि कसोटी मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला. यावरून संघाचा कर्णधार बाबर आझमला (Babar Azam) कर्णधारपदावरून काढून टाकण्याची मागणी होऊ लागली. एकीकडे क्रिकेटमध्ये खराब कामगिरी सुरु असताना बाबर आझम पुन्हा एकदा एका वादामुळे चर्चेत आला. त्याचे काही आक्षेपार्ह व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. यामुळे आता बाबर आझम दुहेरी संकटामध्ये सापडला आहे.

बाबर आझमवर याआधी फसवणुकीचे आरोप झाले असून समोर आलेल्या या व्हिडिओंमुळे चांगलाच वाद निर्माण झाला आहे. इन्स्टाग्रामवरील एका आयडीवरून त्याचे काही व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करण्यात आले. यामध्ये संबंधित तरुणीने बाबर आझमवर फसवणूक केल्याचे आरोप केले आहेत. त्यावरूनच आता बाबर आझम हा हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची दावाही करण्यात आला आहे. या सर्व वादावरून पीसीबीचे नवे अध्यक्ष नजम सेठी आणि पीसीबी व्यवस्थापन लवकरच बाबरला तीनही फॉरमॅटच्या कर्णधारपदावरून काढू शकते, अशी चर्चा आहे.

logo
marathi.freepressjournal.in