यंदा विश्वचषक भारतात खेळल जाणार असल्याने बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानचा संघ विश्वचषकात सहभागी होण्यासाठी भारतात पोहोचला आहे. हैदराबादमध्ये पाकिस्तान संघाचे स्वागत पाहून कर्णधार बाबर आझम खूपच प्रभावित झाला असून त्याने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर भारताकडून मिळालेल्या प्रेम आणि समर्थनाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
विश्वचषकात पाकिस्तान संघ 6 ऑक्टोबर रोजी नेदरलँड्सविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. वर्ल्ड कप 2023 मध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तानचा संघ बुधवारी भारतात पोहोचला.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने भारताकडून मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आनंद व्यक्त केला असून त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याची ती पोस्ट त्याच्या चाहत्यांना खूपच आवडली.
येत्या 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर 2023 या कालावधीत एकदिवसीय विश्वचषकाचे आयोजन भारतात केले जाणार आहे. पाकिस्तानचा संघ ६ ऑक्टोबरला नेदरलँडविरुद्ध सामना खेळणार आहे. कडेकोट बंदोबस्तात पाकिस्तानचा संघ बुधवारी हैदराबादला पोहोचला.
बाबर आझमला भारतात आल्याचा खूप आनंद झाल्याचं दिसत आहे. त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर करताना त्याने कॅप्शन लिहिले की, ''हैदराबादमध्ये मिळालेल्या प्रेम आणि समर्थनामुळे खूप आनंद झाला आहे.'' याआधी वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे स्वागत केल्याबद्दल भारताचे आभार मानले होते.