उपांत्यपूर्व फेरीतच बजरंग पुनिया पराभूत

सागर जगलान याची ७४ किलो वजनी गटात कांस्यपदकासाठी लढत रंगणार आहे.
उपांत्यपूर्व फेरीतच बजरंग पुनिया पराभूत
Published on

ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता बजरंग पुनिया (६५ किलो) याला शनिवारी उपांत्यपूर्व फेरीतच धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवण्याचे त्याचे स्वप्न पुन्हा एकदा अधुरे राहिले आहे. सागर जगलान याची ७४ किलो वजनी गटात कांस्यपदकासाठी लढत रंगणार आहे.

दोन वेळा राष्ट्रकुल स्पर्धेचा विजेचा ठरलेल्या बजरंगला अमेरिकेच्या २३ वर्षीय यिआन्नी दियाकोमिहलिस याच्याकडून तांत्रिक गुणवत्तेच्या (०-१०) आधारावर पराभव पत्करावा लागला. २८ वर्षीय बजरंगच्या नावावर जागतिक स्पर्धेत दोन पदके जमा आहेत. त्यामुळे दियाकोमिहलिस याने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली तर बजरंगला रिपिचेज फेरीद्वारे कांस्यपदक मिळवण्याची संधी प्राप्त होईल. तत्पूर्वी, बंजरंगने आधीच्या लढतीत क्युबाच्या अलेजांड्रो एन्रिक वाल्डेस टोबियर याचा ५-४ असा पराभव केला होता.

logo
marathi.freepressjournal.in