"काही लोकांना आमचे आंदोलन..."; कुस्तीपटूंच्या आंदोलनात राजकीय किनार? काय म्हणाला बजरंग पुनिया?

गेले काही दिवस दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर सुरु असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनावर आता राजकीय हस्तक्षेपाची टीका होत असताना बजरंग पुनियाने दिले स्पष्टीकरण
"काही लोकांना आमचे आंदोलन..."; कुस्तीपटूंच्या आंदोलनात राजकीय किनार? काय म्हणाला बजरंग पुनिया?

गेल्या काही दिवसांपासून भारतातील ऑलिम्पिकवीर कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात आंदोलन सुरु आहे. ब्रिजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आता हे आंदोलन वेगळ्याच कारणासाठी चर्चेत येऊ लागले आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी आणि आपचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी खेळाडूंच्या या आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दर्शवला. यानंतर मात्र हे आंदोलनावर टीका होऊ लागली आहे. यावर ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनियाने स्पष्टीकरण दिले.

बजरंग पुनिया म्हणाला की, "भारतातील महिला खेळाडूंना न्याय मिळावा, म्हणून मी लढा देत आहे. पण, काही लोक या आंदोलनाला प्रक्षोभक आंदोलन म्हणून ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत." अशी टीका त्याने केली. तो म्हणाला की, "काही लोकांना हे आंदोलन प्रक्षोभक करायचे आहे. याचा आम्ही विरोध करतो. हे आंदोलन म्हणजे भारतामधील मुलींना न्याय मिळवून देण्यासाठीचा लढा असून भारतीय कुस्तीला वाचवण्याचा लढा आहे. याठिकाणी जे लोक एकत्र जमले आहेत ते कोणत्याही राजकीय फायद्यासाठी नसून आमच्या समर्थनार्थ आहेत. राजकारण आणि इतर गोष्टी नंतर पण महिलांचा सन्मान आणि प्रतिष्ठा आधी येते." असे स्पष्टीकरण त्याने दिले आहे. तसेच, हे खेळाडूंचे आंदोलन असून कोणत्याही राजकीय पक्षात सहभागी होऊ नका असे आवाहनदेखील त्याने केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in