भारतीय कुस्ती महासंघावरील बंदी हटवली!

कुस्ती महासंघाच्या कामकाजात शासकीय हस्तक्षेप वाढल्याने ऑगस्टमध्ये जागतिक महासंघाने कुस्ती महासंघावर बंदी घातली होती.
भारतीय कुस्ती महासंघावरील बंदी हटवली!

नवी दिल्ली : जागतिक कुस्ती महासंघाने (यूडब्ल्यूडब्ल्यू) मंगळवारी अखेर भारतीय कुस्ती महासंघावरील (डब्ल्यूएफआय) बंदी हटवली. त्यामुळे आता जागतिक पातळीवरील स्पर्धांमध्ये भारताचे खेळाडू तिरंग्याचे प्रतिनिधित्व करू शकतात.

कुस्ती महासंघाच्या कामकाजात शासकीय हस्तक्षेप वाढल्याने ऑगस्टमध्ये जागतिक महासंघाने कुस्ती महासंघावर बंदी घातली होती. त्यामुळे जागतिक स्पर्धांमध्ये खेळताना भारतीय खेळाडूंच्या नावापुढे तिरंगी नव्हता. भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीचा घोळ व अन्य प्रकरणे अद्याप सुरूच असताना जागतिक महासंघाने मात्र कुस्तीपटूंना काहीसा दिलासा दिला आहे. आता २६ जुलैपासून रंगणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देशाचे खेळाडू भारतीय ध्वजाखाली खेळू शकतील.

आपल्या कुस्तीपटूंना आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या ध्वजाखाली खेळता आले नव्हते. या स्पर्धेसाठी भारतीय कुस्ती महासंघाकडून नाही, तर ‘आयओए’कडून खेळाडूंची नावे पाठवली जातात. गेल्या काही काळापासून कुस्ती महासंघ विविध कारणांनी चर्चेत आहे. महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचा आरोप करताना कुस्तीपटूंनी आंदोलन पुकारले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in