बांगलादेशात शाकिबविरोधात निदर्शने; मायदेशात अखेरची कसोटी खेळण्याचे स्वप्न अपुरेच

बांगलादेशचा डावखुरा अष्टपैलू शाकिब अल हसनविरोधात सोमवारी मिरपूर येथील शेर-ए-बांगला स्टेडियमबाहेर निदर्शने करण्यात आली. तसेच शाकिबने बांगलादेशमध्ये प्रवेश केल्यास, त्याची हत्या करण्यात येईल, अशी धमकीही देण्यात आली.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मिरपूर : बांगलादेशचा डावखुरा अष्टपैलू शाकिब अल हसनविरोधात सोमवारी मिरपूर येथील शेर-ए-बांगला स्टेडियमबाहेर निदर्शने करण्यात आली. तसेच शाकिबने बांगलादेशमध्ये प्रवेश केल्यास, त्याची हत्या करण्यात येईल, अशी धमकीही देण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव मायदेशात अखेरची कसोटी खेळण्याचे शाकिबचे स्वप्न अपुरे राहिले. बांगलादेश-दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली कसोटी सोमवारपासून सुरू झाली.

३७ वर्षीय शाकिबचा बांगलादेशमधील हिंसाचारामध्ये हात असल्याचा आरोप आहे. १४७ जणांची नावे असलेल्या एफआयआरमध्ये त्याचाही समावेश आहे. त्यामुळे शाकिब गेल्या काही महिन्यांपासून मायदेशात परतलेला नाही. सध्या तो न्यूयॉर्कमध्ये वास्तव्यास आहे. भारताविरुद्धची मालिका संपल्यानंतर तो थेट न्यूयॉर्कला दाखल झाला. मात्र त्याने मायदेशात अखेरची कसोटी खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याचा संघात समावेश करण्यात आला. मात्र संतप्त बांगलादेशी नागरिकांनी शाकिबच्या घराबाहेर तसेच स्टेडियमबाहेर आंदोलने केली. नाइलाजास्तवर सुरक्षेमुळे शाकिबने बांगलादेशमध्ये येणे टाळले.

दरम्यान, पहिल्या कसोटीत बांगलादेशचा पहिला डाव ४०.१ षटकांत १०६ धावांत आटोपला. त्यानंतर आफ्रिकेची पहिल्या दिवसअखेर ६ बाद १४० अशी स्थिती आहे.

logo
marathi.freepressjournal.in