Women's IPL : महिला आयपीएलबाबत मोठी अपडेट समोर

या बैठकीत महिला आयपीएलसह अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पुरुषांप्रमाणेच महिला आयपीएलचेही पुढील वर्षी आयोजन
Women's IPL : महिला आयपीएलबाबत मोठी अपडेट समोर
ANI

बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा आज मुंबईत पार पडली. या बैठकीत 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य आणि माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या बैठकीत महिला आयपीएलसह अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पुरुषांप्रमाणेच महिला आयपीएलचेही पुढील वर्षी आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. महिला आयपीएलमध्ये सुरुवातीला पाच संघ सहभागी होतील. पण महिलांच्या आयपीएलचा लिलाव कसा होणार? यासंदर्भात निर्णय अजून बाकी आहे. 

बीसीसीआयच्या सध्याच्या योजनेनुसार, या लीगमध्ये फक्त पाच संघ सहभागी होणार आहेत. पुरुषांच्या आयपीएलच्या तुलनेत, या लीगमधील संघ आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 4 ऐवजी 5 परदेशी खेळाडूंचा समावेश करू शकतो. या पाच परदेशी खेळाडूंपैकी चार आयसीसीचे पूर्ण सदस्य असलेल्या देशांतील असतील. तर, 5 वा खेळाडू असोसिएट्स देशाचा असू शकतो. प्रत्येक संघात जास्तीत जास्त १८ खेळाडू असतील. ज्यामध्ये जास्तीत जास्त 6 विदेशी खेळाडू असतील.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in