कोची संघाला बीसीसीआय देणार ५३८ कोटी रुपये

आयपीएलशी संबंधित एका वादात मुंबई उच्च न्यायालयाने बीसीसआयला मोठा दणका दिला आहे. २०११च्या मोसमात खेळलेल्या कोची टस्कर्स केरळ संघाच्या मालकांना ५३८ कोटी देण्याचे आदेश हायकोर्टाने जारी करत याप्रकरणी लवादाचा निकाल योग्य ठरवला आहे.
कोची संघाला बीसीसीआय देणार ५३८ कोटी रुपये
ANI
Published on

मुंबई : आयपीएलशी संबंधित एका वादात मुंबई उच्च न्यायालयाने बीसीसआयला मोठा दणका दिला आहे. २०११च्या मोसमात खेळलेल्या कोची टस्कर्स केरळ संघाच्या मालकांना ५३८ कोटी देण्याचे आदेश हायकोर्टाने जारी करत याप्रकरणी लवादाचा निकाल योग्य ठरवला आहे.

२०११च्या मोसमात आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या कोची संघाची मालकी रेंदेव्हू स्पोर्ट्स वर्ल्ड आणि कोची क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे होती. मात्र पहिल्याच मोसमानंतर सप्टेंबर २०११मध्ये गव्हर्निंग कौन्सिलनं शिस्तभंग कारवाईखाली संघाला बाहेरचा रस्ता दाखवला होता. बीसीसीआयसोबत झालेल्या कराराचं उल्लंघन केल्यानं ही कारवाई करण्यात आली होती. ज्यात फ्रँचायझीनं बँक गँरंटी जमा न करणं, स्टेडियम उपलब्ध करून देण्यात असमर्थ, समभागातील वाद आणि सामन्यांची संख्या या गोष्टींची पूर्तता करु न शकल्याची कारणे होती.

या कारवाईला फ्रँचाईजीच्या मालकांनी हायकोर्टात आव्हान दिलं होते. त्यानंतर २०१२मध्ये हे प्रकरण मध्यस्थीकरता पाठवण्यात आलं. तीन वर्षांच्या सुनावणीनंतर साल २०१५मध्ये आब्रिटेशनचा निकाल फ्रँचायझीच्या बाजून लागला होता.

या निकालाला बीसीआयनं तातडीनं हायकोर्टात आव्हान दिलं होतं. तेव्हा मध्यस्थांनी दिलेला निकाल हा योग्यच असल्याचं स्पष्ट करत हायकोर्टाने बीसीसीआयला कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे. बीसीसीआय याविरोधात सर्वोच्च न्यायालयात लवकरच दाद मागणार असल्याचे समजते.

logo
marathi.freepressjournal.in