आयपीएल सामन्यावर बेटींग घेणाऱ्या आठजणांना ओशिवरा पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. तुषार संतोष सावडिया, रविंद्रसिंग जगनारायणसिंग राठोड, निरज संजय सावडिया, विक्रम धनश्याम कच्छवा, रोहित जगदीश गेहलोत, फरहान मलिक अन्वर अहमद आणि विक्रमसिंग खेमसिंग चौहाण अशी या आठजणांची नावे आहेत. पोलीस कोठडीनंतर या सर्वांना अंधेरीतील लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
आयपीएल सामन्यावर अंधेरीतील एका पॉश निवासी इमारतीमधून काही बुकी ऑनलाईन बेटींग घेत असल्याची माहिती खार पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी या पथकाने अंधेरीतील लोखंडवाला, यमुनानगरच्या ग्रीन क्रस्ट अपार्टमेंटच्या फ्लॅट क्रमांक ५०४ मध्ये छापा टाकला होता. यावेळी तिथे आठजण सनराईज हैद्राबाद आणि लखनौ सुपर जॉईट्स या सामन्यावर ऑनलाईन बेटींग घेताना दिसून आले.