टीम इंडियाची WTC च्या अंतिम सामन्यातील पूर्ण फी कापली; शुबमन गिलवर आकारला 115 टक्के दंड, 'या' चुकीमुळे केली कारवाई

स्लो ओव्हररेटवरून ही कारवाई करण्यात आली आहे.
टीम इंडियाची WTC च्या अंतिम सामन्यातील पूर्ण फी कापली; शुबमन गिलवर आकारला 115 टक्के दंड, 'या' चुकीमुळे केली कारवाई

भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज शुबमन गिलला शिक्षा सुनावण्यात आली आहे. क्रिकेट विश्वातली सर्वोत्तम संस्था असलेल्या ICC ने ही शिक्षा सुनावली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना झाल्यानंतर ICC ने ही शिक्षा सुनावली आहे. आता नेमकी ही शिक्षा का सुनावली आणि काय शिक्षा सुनावली असा प्रश्न क्रिकेट प्रेमींना तसंच शुबमनच्या चाहत्यांना पडली असेल. पण फक्त शुबमनच नाही तर भारतीय संघाला देखील ICC ने मोठा झटका दिला आहे. काल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना संपला. या सामन्यात भारतीय संघाचा 209 धावांनी पराभव करत ऑस्ट्रेलियानं विश्वचषकावर आपलं नाव कोरलं.

भारतीय संघाला WTC फायनल खेळण्यासाठी एक रुपया सुद्दा मिळणार नाही. ही कारवाई ICC कडून टीम इंडियावर करण्यात आली आहे. स्लो ओव्हररेटवरून ही कारवाई करण्यात आली आहे. याच स्लो ओव्हररेटमुळे ऑस्ट्रेलिया संघाची 80 टक्के फी कापण्यात आली आहे. शुबमनला मात्र दंड म्हणून ICC ला दंड भरावा लागणार आहे. शुबमन गिलला दंड म्हणून 15 टक्के अधिक रक्कम भरावी लागणार आहे. त्याला मॅच फी च्या 115 टक्के दंड भरावा लागणार आहे. यात त्याची मॅच फी पूर्ण कापली असून त्याला 15 टक्के अधिक रक्कम भरावी लागणार आहे.

शुबमन गिलवर WTC फायनलच्या चौथ्या दिवशी केलेल्या चुकीमुळे दंड आकारण्यात आला आहे. त्याला कोड ऑफ कंडक्टच्या 2.7 मध्ये दोषी धरण्यात आलं आहे. या नियमानुसार खेळाडूला आंतरराष्ट्रीय सामन्यात घटलेल्या घटनेवर प्रतिक्रिया देण्यास मनाई आहे. गिलने ही चूक केल्यानं त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. अंतिम सामन्याच्या दुसऱ्या इनिंगमध्ये टीव्ही अंपायर रिचर्ड केटलब्रो यांनी कॅमरुन ग्रीनने पकडलेली गिलची कॅच क्लीन असल्याचा निकाल दिला. या कॅचवर संशय असल्यानं मोठा वाद निर्माण झाला होता. या दिवशीचा खेळ संपल्यानंतर शुबमननं सोशल मीडियावर या कॅचबद्दल भाष्य केलं होतं. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in