विराट कोहलीची मोठी झेप;२९व्या स्थानावरून थेट १५व्या स्थानी विराजमान

भारताचा सूर्यकुमार यादव चौथ्या स्थानावर असून कर्णधार रोहित शर्मा चौदाव्या स्थानावर आहे.
 विराट कोहलीची मोठी झेप;२९व्या स्थानावरून थेट १५व्या स्थानी विराजमान

आशिया चषकातील चमकदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आयसीसी टी-२० क्रमवारीत २९व्या स्थानावरून थेट १५व्या स्थानावर पोहोचला आहे. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरलेला वानिंदू हसरंगा टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा सूर्यकुमार यादव चौथ्या स्थानावर असून कर्णधार रोहित शर्मा चौदाव्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा यष्टिरक्षक-फलंदाज मोहम्मद रिझवान टी-२० क्रमवारीत अव्वल आहे.

कर्णधार बाबर आझम तिसऱ्या स्थानावर घसरला; तर दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्करम दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. गोलंदाजीच्या क्रमवारीत भुवनेश्वर कुमारची सातव्या स्थानावर घसरण झाली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in