वन-डे क्रिकेट क्रमवारीत भारताच्या 'या' फलंदाजाची मोठी झेप

झिम्बाब्वेविरुद्ध नुकत्याच झालेल्या तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेत शुभमनने चमकदार कामगिरी केली होती
वन-डे क्रिकेट क्रमवारीत भारताच्या 'या' फलंदाजाची मोठी झेप

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी जाहीर केलेल्या वन-डे क्रिकेट क्रमवारीत भारताचा समामीवीर फलंदाज शुभमन गिल ४५ स्थानांनी झेप घेत ३८व्या स्थानावर पोहोचला. विराट कोहलीने आपले पाचवे स्थान कायम ठेवले.

झिम्बाब्वेविरुद्ध नुकत्याच झालेल्या तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेत शुभमनने चमकदार कामगिरी केली होती. हरारे येथील शेवटच्या सामन्यात त्याने पहिलेवहिले शतक झळकाविले. गिलने ९७ चेंडूत १३० धावा केल्या होत्या.

माजी कर्णधार विराट कोहली ७४४ गुणांसह पाचव्या स्थानावर कायम राहिला. कर्णधार रोहित शर्मा सहाव्या स्थानावर आहे. शिखर धवनला एका स्थानाचा फटका बसला असून तो १२व्या स्थानावर आला आहे. झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या तीन सामन्यांत त्याने १५४ धावा केल्या होत्या. धवनने पहिल्या आणि तिसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकाविले होते.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम ८९१ गुणांसह पहिल्या स्थानावर कायम असून दक्षिण आफ्रिकेचा रुसी व्हॅन डर डुसेन ७८९ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट पहिल्या स्थानावर; तर भारताचा जसप्रीत बुमराह चौथ्या स्थानावर आहे. बांगलादेशचा शाकिब अल हसन अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. या यादीत पहिल्या १० मध्ये एकही भारतीय खेळाडू नाही.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in