आयसीसी वन-डे क्रिकेट क्रमवारीत 'या' महिला खेळाडूंची मोठी झेप

महिलांच्या ताज्या वन-डे क्रमवारीत हरमनप्रीतने चार स्थानांच्या सुधारणेसह पाचवा क्रमांक पटकाविला
आयसीसी वन-डे क्रिकेट क्रमवारीत 'या' महिला खेळाडूंची मोठी झेप
Published on

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत मंकडिंग पद्धतीने बाद करणारी दीप्ती शर्मा, कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी आयसीसी वन-डे क्रिकेट क्रमवारीत मोठी झेप घेतली.

आयसीसीने जाहीर केलेल्या महिलांच्या ताज्या वन-डे क्रमवारीत हरमनप्रीतने चार स्थानांच्या सुधारणेसह पाचवा क्रमांक पटकाविला. दीप्ती शर्मा आणि सलामीवीर स्मृती मानधना यांनीही क्रमवारीत आगेकूच सुरू ठेवली. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत १४३ धावांची खेळी करणारी महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने महिलांच्या एकदिवसीय क्रमवारीत चार गुणांची झेप घेत पाचवे स्थान मिळवले आहे. लॉर्ड्सवर झालेल्या अखेरच्या सामन्यात दीप्ती शर्माने नाबाद ६८ धावांची खेळी करून विजयात महत्त्वाचा वाटा उचलला होता. ती आठ स्थानाने पुढे सरकून २४व्या क्रमांकावर पोहोचली. मानधनाने इंग्लंड दौऱ्यावर दोन सामन्यात अनुक्रमे ४० आणि ५० धावा केल्या होत्या. त्याच्या जोरावर ती एक स्थानाच्या प्रगतीसह सहाव्या क्रमांकावर पोहोचली. टी-२०च्या क्रमवारीत फलंदाजांमध्ये मानधना दुसऱ्या क्रमांकावर आहे. पूजा वस्त्राकर चार स्थानाने वर सरकून ४९ व्या गेली; तर हर्लिन देओल ८१व्या क्रमांकावर आली. गोलंदाज रेणुका सिंग ७०व्या क्रमांकावरून ३५व्या क्रमांकावर आली.

हरमनप्रीतच्या भारतीय संघाने इंग्लंडला त्यांच्याच भूमीत ३-० असा प्रथमच व्हाईटवॉश दिला होता. या मालिकेत चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनी क्रमवारीत शानदार प्रगती केली.

logo
marathi.freepressjournal.in