Rishabh Pant : रिषभबाबत मोठी अपडेट समोर, तिसऱ्या शस्त्रक्रियेची गरज?

डिस्चार्ज मिळूनही ऋषभ पंतला मैदानात परतण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार
Rishabh Pant : रिषभबाबत मोठी अपडेट समोर, तिसऱ्या शस्त्रक्रियेची गरज?

तीन आठवड्यांपूर्वी कार अपघातात गंभीर जखमी झालेला ऋषभ पंत (Rishabh Pant) लवकरच मैदानात परतण्याची शक्यता आहे. त्याला दोन आठवड्यांत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो. दरम्यान, डिस्चार्ज मिळूनही ऋषभ पंतला मैदानात परतण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

कार अपघातात ऋषभ पंतच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याच्यावर दोन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. साधारण सहा आठवड्यांनी आणखी एक शस्त्रक्रिया होणार होती. पण आता ऋषभला तिसऱ्या शस्त्रक्रियेची गरज भासणार नसल्याची माहिती मिळत आहे. तसेच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने येत्या दोन आठवड्यांत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in