IND vs AUS : भारताचा ऑस्ट्रेलियावर मोठा विजय, मालिकेत 1-0 आघाडी

ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव अवघ्या 91 धावांवर संपला आणि 1 डाव आणि 132 धावांनी सामना जिंकला
IND vs AUS : भारताचा ऑस्ट्रेलियावर मोठा विजय, मालिकेत 1-0 आघाडी

नागपूर येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने मोठा विजय नोंदवला आहे. भारताने हा सामना 1 डाव आणि 132 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारताने सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. ज्यामध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला 177 धावांत गुंडाळले आणि पहिल्या डावात 400 धावा करत 223 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव अवघ्या 91 धावांवर संपला आणि 1 डाव आणि 132 धावांनी सामना जिंकला.

भारताकडून रवींद्र जडेजाने दोन्ही डावात 7 तर अश्विनने दोन्ही डावात 8 विकेट्स घेतल्या. याशिवाय कर्णधार रोहित शर्माने 120 धावा केल्या तर अक्षर पटेलने 84 आणि रवींद्र जडेजाने 70 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा युवा फिरकी गोलंदाज टॉड मर्फीने एका डावात 7 विकेट घेत चांगली कामगिरी केली, पण शेवटी भारताने हा सामना मोठ्या फरकाने जिंकला. भारताचे स्टार फिरकीपटू जोडी जडेजा आणि अश्विन यांनी मिळून एकूण 8 विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 177 धावांत गुंडाळले. यावेळी रवींद्र जडेजाने सर्वोत्तम गोलंदाजी केली. त्याने 22 षटकात 47 धावा देत एकूण पाच गडी बाद केले. दुसरीकडे अश्विनने तीन विकेट घेतल्या. सिराज आणि शमीने प्रत्येकी एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाकडून यावेळी अॅलेक्स कॅरीने 37 आणि लॅबुशेनने 49 धावा केल्या. 

रोहितने दमदार शतक झळकावत 120 धावा केल्या. त्यानंतर जडेजा आणि अक्षर यांनी मजबूत भागीदारी रचली पण तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात जडेजा 70 धावांवर बाद झाला. त्यानंतर शमीने 37 धावा केल्या. त्यानंतर अक्षर ८४ धावांवर बाद झाल्यावर भारताचा डाव ४०० धावांवर संपला. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथ शेवटपर्यंत 25 धावांवर नाबाद राहिला पण त्याला कोणतीही साथ न मिळाल्याने ऑस्ट्रेलियाने सामना गमावला. या विजयासह भारताने चार सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असून आता दुसरा सामना 17 फेब्रुवारीपासून दिल्लीत खेळवला जाणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in