सलग चौथ्या वर्षी 'बिकेटी'ची मुंबई इंडियन्ससोबत भागीदारी

बीकेटी टायर्सने 'ऑफिशियल टायर पार्टनर' म्हणून पाचवेळा चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्ससोबत आपली भागीदारी वाढवली
सलग चौथ्या वर्षी 'बिकेटी'ची मुंबई इंडियन्ससोबत भागीदारी

भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आणि ऑफ-हायवे टायर मार्केटमधील जागतिक खेळाडू 'बाळकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड' (बीकेटी) हे ५ वेळा चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्ससाठी आगामी टी २० क्रिकेट लीग २०२३मध्ये 'ऑफिशियल टायर पार्टनर' म्हणून कायम आहेत. या वर्षी बीकेटी आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सहकार्याचा चौथा हंगाम आहे. बहुप्रतीक्षित आयपीएल २०२३ ही स्पर्धा ३१ मार्च २०२३ रोजी सुरू होईल.

या भागीदारीबद्दल आनंद व्यक्त करताना बिकेटीचे सहव्यवस्थापकीय संचालक राजीव पोद्दार म्हणाले की, "मुंबई इंडियन्ससोबत सलग चौथ्या वर्षी भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. मुंबई इंडियन्स फ्रँचायझी केवळ सर्वात सातत्यपूर्ण संघांपैकी एक नाही, तर ते देखील मजबूत नेतृत्वगुण, शिस्त, कठोर परिश्रम आणि लवचिकता या मूलभूत मूल्यांचे प्रदर्शन करत आहेत. जे आमच्या नैतिकतेशी पूर्णपणे जुळतात. मैदानावरील त्यांची विजयाची भावना खरोखर प्रेरणादायी आहे. आमच्या ब्रँडच्या कथा जागतिक स्तरावर शेअर करण्यासाठी त्यांच्यासोबत मोहीम राबविण्याचा आम्हाला सन्मान वाटतो." अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

ते पुढे म्हणाले की, "१६० देशांमध्ये आमची उपस्थिती असून जगभरातील क्रिकेटपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. ही भागीदारी आम्हाला जगभरातील मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांशी सक्रियपणे गुंतवून ठेवण्याची आणि संघाशी घट्ट नाते निर्माण करण्यास प्रोत्साहित करते. आम्ही मुंबई इंडियन्ससोबत हा प्रवास सुरू ठेवण्यास आणि त्यांच्या क्रिकेट विषयक क्रीडाभावनेला प्रोत्साहन देण्यासाठी उत्सुक आहोत. आम्ही क्रिकेटच्या खेळपट्टीवर उत्साह दाखवणाऱ्या मुंबई इंडियन्स संघासोबत रोमांचक सामन्यांनी भरलेल्या वर्षाची वाट पाहत आहोत." या भागीदारीवर भाष्य करताना मुंबई इंडियन्सचे प्रवक्ते म्हणाले, "बीकेटी सोबत मैदानावर आणि मैदानाबाहेर एक मजबूत कार्यरत भागीदारी निर्माण करताना आम्हाला खरोखर आनंद होत आहे. बीकेटीला आमची मुंबई इंडियन्स पलटन जगभरात पोहोचण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून मुंबई इंडियन्सचा लाभ घेत राहण्यासाठी उत्सुक आहोत."

logo
marathi.freepressjournal.in