सागर कातुर्डेची 'नॉनस्टॉप' जेतेपदांची मालिका कायम; सलग ११ व्या विजेतेपदावर कब्जा

सागर कातुर्डेसाठी २०२४ वर्ष संस्मरणीय ठरले आहे. त्याच्या आखीव-रेखीव शरीरयष्टीसमोर महाराष्ट्रातील एकही शरीरसौष्ठवपटू त्याला मागे टाकण्यात यशस्वी ठरला नाही.
सागर कातुर्डेची 'नॉनस्टॉप' जेतेपदांची मालिका कायम; सलग ११ व्या विजेतेपदावर कब्जा

मुंबई : सागर कातुर्डेने आपली नॉनस्टॉप जेतेपदांची मालिका कायम ठेवताना ‘नमो चषक आमदार श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेवरही नाव कोरले आहे. हे त्याचे गेल्या दोन महिन्यांमधील सलग ११वे जेतेपद ठरले आहे.

सागर कातुर्डेसाठी २०२४ वर्ष संस्मरणीय ठरले आहे. त्याच्या आखीव-रेखीव शरीरयष्टीसमोर महाराष्ट्रातील एकही शरीरसौष्ठवपटू त्याला मागे टाकण्यात यशस्वी ठरला नाही. घाटकोपर येथे आयोजित या स्पर्धेतही सागरला उमेश गुप्ता, संतोष भरणकर, चेतन नाईक यांनी कडवी झुंज दिली, पण अखेर सागरच विजेता ठरला. संकेत भरमने बेस्ट पोझरचा पुरस्कार पटकावला. बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना, मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटनेच्या मान्यतेने पार पडलेल्या या स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा शरीरसौष्ठव संघटनेच्या अजय खानविलकर, राजेश सावंत, विशाल परब, सुनील शेगडे, भारत श्री शाम रहाटे, आयोजक अनिल निर्मळे यांच्या उपस्थितीत पार पडला.

विविध गटांतील विजेते पुढीलप्रमाणे

५५ किलो : १. गितेश मोरे (समर्थ व्यायामशाळा), २. अक्षय गवाणे (पॉवर फिटनेस), ३. रंजित बंगेर (आदित्य जिम); ६० किलो : १. गणेश पाटील (फिजीक जिम), २. रोशन भोसले (परब फिटनेस), ३. प्रशांत घोलम (एस बी फिटनेस); ६५ किलो : १. उमेश पांचाळ (परब फिटनेस), २. संकेत भरम (परब फिटनेस), ३. अनिल जयस्वाल (सोमय्या कॉलेज); ८० किलो : १. सागर कातुर्डे (आयकर विभाग), २. अक्षय खोत (परब फिटनेस), ३. अमित साटम (माँसाहेब जिम).

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in