मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देणाऱ्याला विराट-अनुष्काने केले माफ

मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देणाऱ्याला विराट-अनुष्काने केले माफ

क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शमार्च्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध सुरू असलेल्या खटल्यात एफआयआर रद्द करण्यात आला

क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शमार्च्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध सुरू असलेल्या खटल्यात एफआयआर रद्द करण्यात आला. आरोपीने माफी मागितल्यानंतर आणि तक्रारदारांनी खटला मागे घेण्याची तयारी दर्शविल्यांनतर हा निर्णय घेण्यात आला. न्यायमूर्ती ए एस गडकरी आणि पीडी नाईक यांचा समावेश असलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने कोहलीचे या प्रकरणातील तक्रारदारांनी आरोपींवरील आरोप वगळण्यास सहमती दिल्यानंतर एफआयआर रद्द करण्याचा आदेश दिला.

२०२१ मध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदाच भारताला पाकिस्तानविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा पाकिस्तानने भारताचा १० विकेट्सने एकतर्फी पराभव केला होता. त्यानंतर हैदराबादच्या रामनागेश अकुबथिनीने ट्विट करून कोहलीच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर दिल्ली महिला आयोगाने केलेल्या कारवाईवर हैदराबाद पोलिसांनी सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या रामनागेश अकुबथिनीला अटक केली होती.

अकुबथिनीला नोव्हेंबर २०२१ मध्ये अटक करण्यात आली होती. यानंतर त्यांना कलम ६७ बी अंतर्गत जामीन मिळाला. यानंतर २०२२ मध्ये अकुबथिनीने खटला रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली. आरोपीने न्यायालयात खटला रद्द करण्यासाठी याचिका दाखल करताना त्या याचिकेत त्याच्याविरुद्ध कोणताही गुन्हेगारी इतिहास नसल्याचा दाखलाही दिला होता. याशिवाय, जेईई रँकधारक असल्याने त्याचे भवितव्य विचारात घेण्यास सांगितले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in