पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून बॉक्सिंग डे कसोटी

१९९५पासून पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकही कसोटी सामना जिंकलेला नाही.
पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून बॉक्सिंग डे कसोटी
PM

मेलबर्न : ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या म्हणजेच ‘बॉक्सिंग डे’ कसोटीला मंगळवारपासून मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड (एमसीजी) येथे प्रारंभ होईल. उभय संघांतील तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिली लढत जिंकून १-० अशी आघाडी घेतली आहे.

१९९५पासून पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. गेल्या १५ सामन्यांत त्यांनी पराभव पत्करला असून यावेळी त्यांना खेळाडूंच्या दुखापतींनीही सतावले आहे. अबरार अहमद, खुराम शहझाद व नोमान अली हे खेळाडू जायबंदी असून ऑफस्पिनर साजिद खान आणि यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान यांना दुसऱ्या कसोटीसाठी १२ खेळाडूंत स्थान लाभले आहे. त्यामुळे सर्फराझ खानला डच्चू देण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in