BREAKING: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी काळाच्या पडद्याआड ; वयाच्या 77 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बिशनसिंग बेदी यांनी १९६७ ते १९७९ या कालावधीत भारतासाठी 67 कसोटी सामने तर 10 एकदिवसीय सामने खेळले आहेत
BREAKING: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी काळाच्या पडद्याआड ; वयाच्या  77 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

क्रीडासृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. भारताचे महान फिरकीपटू बिशन सिंग बेदी यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या ७७व्या वर्षी अखेचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने सगळीकडे हळहळ व्यक्तं केली जातं आहे. बिशनसिंग बेदी यांनी १९६७ ते १९७९ या कालावधीत भारतासाठी 67 कसोटी सामने तर 10 एकदिवसीय सामने खेळले आहेत. बिशन सिंग बेदी यांचा जन्म 25 सप्टेंबर 1946 रोजी अमृतसर इथं झाला. त्यांनी 1966 मध्ये भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघात पदार्पण केलं आणि 1979 पर्यंत ते आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करत होते.

जागतिक क्रिकेटमधील एक महान डावखुरा फिरकी गोलंदाज म्हणून बिशन सिंग बेदी यांना ओळखलं जातं. बेदी हे आजपर्यंतचे भारताचे सर्वात यशस्वी डावखुरे फिरकी गोलंदाज खेळाडू होते. या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये रवींद्र जडेजाने त्यांना मागे टाकलं होतं. 1971 मध्ये इंग्लंडविरुद्ध भारताच्या ऐतिहासिक मालिका विजयात देखील त्यांनी महत्त्वपूर्णक भूमिका बजावली होती, जखमी अजित वाडेकर यांच्या अनुपस्थितीत त्यांनी भारतीय संघाचं कर्णधारपद भूषवलं. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने एक स्पर्धात्मक क्रिकेट राष्ट्र म्हणून आपली प्रतिष्ठा निर्माण केली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in