ब्रिज भूषण सिंह वडिलांसारखे; निरिक्षण समितीने तक्रारकर्त्यांनाच सुनावले

या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष निरिक्षण समिती नेमण्यात आली आहे. या समितीने पीडित महिलांची बाजू ऐकून घेतली
ब्रिज भूषण सिंह वडिलांसारखे; निरिक्षण समितीने तक्रारकर्त्यांनाच सुनावले
@ANI
Published on

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिज भूषण सिंह याच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आणि आर्थिक गैरव्यवराहाचे आरोप केले आहे. त्याला अटक करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या जंतर-मंतर येथे पैलवानांनी आंदोलन सुरु केले आहे. ब्रिज भूषण सिंहने मात्र त्याच्यावर झालेले सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत फेटाळले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष निरिक्षण समिती नेम्यात आली आहे. या समितीने पीडित महिलांची बाजू ऐकून घेतली खरी. मात्री, यावेळी समितीकडून तक्रारदार महिला कुस्तीपटूंनाच सुनावल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत कुस्तीपटूंनी याबाबतचा खुलासा केला आहे.

गठित समितीने तक्रारदार कुस्तीपटूंना म्हटले की, "ब्रिज भूषण हे तुमच्या वडिलांसारखे आहेत. त्यांनी कोणत्याही वाईट हेतून स्पर्श केला नसेल. ते निष्पाप असून तुमचा गैरसमज झाला आहे," असे समितीकडून पीडितांनी सांगण्यात आले आहे. तसेच यावेळी भारतीय कुस्ती प्राधिकरणाच्या प्रतिक्षा कक्षात कुस्ती महासंघाचे अनेक सदस्य, प्रशिक्षक तसेच ब्रिज भूषणच्या जवळचे असलेले लोक हजर असल्याने तेथील वातावरण भीतीदायक असल्याचेही पीडितांनी सांगितले आहे. कुस्तीपटूंनी आपले म्हणणे फक्त महिला सदस्यांसमोर मांडू ही विनंती केली होती. मात्र, ती देखील नाकारण्यात आल्याचे पीडितांनी सांगितले.

"चौकशी समितीने हे प्रकरण लवकर गुडाळण्याचा प्रयत्न केल्याचे जाणवले असून समितीचे सदस्य एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देत होते. आमची भावनिक स्थिती समजून न घेता, तसेच आमचे विधान पुर्ण व्हायच्या आधी आम्हाला पुढे जाण्यास सांगितेल जात होते." असे देखील एका कुस्तीपटूने सांगितले आहे. यावेळी पुरावे सादर करत नाही, तोवर आम्ही काही करु शकत नाही. पुराव्या अभावी आमचे हात बांधले असल्याचे समितीकडून सांगण्यात आले. परंतु, अत्याचार करतेवेळी कोण रेकॉर्डिंग सुरु ठेवेल, असा सवाल पीडितांनी उपस्थित केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in