बुमरा तिन्ही प्रकारांतील सर्वोत्तम गोलंदाज: पाँटिंग

गेल्या पाच-सहा वर्षांत क्रिकेटच्या तिन्ही प्रारूपांत मिळून सर्वोत्तम गोलंदाजाची निवड करण्याची वेळ येते तेव्हा जसप्रीत बुमराला पर्याय नसल्याचे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने व्यक्त केले.
बुमरा तिन्ही प्रकारांतील सर्वोत्तम गोलंदाज: पाँटिंग
BCCI
Published on

सिडनी : गेल्या पाच-सहा वर्षांत क्रिकेटच्या तिन्ही प्रारूपांत मिळून सर्वोत्तम गोलंदाजाची निवड करण्याची वेळ येते तेव्हा जसप्रीत बुमराला पर्याय नसल्याचे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने व्यक्त केले.

जूनमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकात बुमराने स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावून भारताला जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. तसेच क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत किमान एकदा तरी जागतिक क्रमवारीत अग्रस्थान पटकावणारा तो एकमेव गोलंदाज आहे. “एक-दोन वर्षांपूर्वी बुमराला काही दुखापती झाल्या आणि त्यानंतर तो पुन्हा सर्वोत्तम कामगिरी करू शकेल का, असे प्रश्न विचारले जात होते. मात्र, माझ्या मते, दुखापतीतून सावरून पुनरागमन केल्यापासून त्याच्या गोलंदाजीत अधिकच सुधारणा झाली आहे. ‘आम्हाला बुमराविरुद्ध खेळायला आवडत नाही. तो कधी काय करेल सांगता येत नाही. त्याच्याविरुद्ध धावा करणे फार अवघड आहे,’ असे अन्य संघांतील खेळाडू सांगतात. यावरूनच बुमराच्या गुणवत्तेचा प्रत्यय येतो. इन स्विंग असो, आऊट स्विंग असो की सीम गोलंदाजी… बुमराच्या ताफ्यात सर्वच चेंडू आहेत. गेल्या पाच-सहा वर्षांत क्रिकेटच्या तिन्ही प्रारूपांत मिळून त्याच्यापेक्षा चांगला गोलंदाज मी पाहिलेला नाही,” असे पाँटिंग म्हणाला.

logo
marathi.freepressjournal.in