खेळामध्ये दबावाखाली येऊन कोणाकडूनही चूक होऊ शकते - विराट कोहली

माझे क्रिकेट करिअर धोक्यात येते की काय? अशी भीती मला वाटत होती
खेळामध्ये दबावाखाली येऊन कोणाकडूनही 
चूक होऊ शकते - विराट कोहली

“खेळामध्ये दबावाखाली कोणाकडूनही चूक होऊ शकते. मी माझ्या कारकीर्दीतील पहिल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळत होतो. हा सामना पाकिस्तानविरोधात होता. त्यावेळी मी शाहीद आफ्रिदीने टाकलेल्या चेंडूवर अतिशय चुकीच्या पद्धतीने फटका मारला होता. याच एका चुकीमुळे मी त्या दिवशी पहाटे ५ वाजेपर्यंत झोपू शकलो नव्हतो. रात्री मी फक्त रुमच्या छताकडे पाहत होतो. यावेळी माझे क्रिकेट करिअर धोक्यात येते की काय? अशी भीती मला वाटत होती,” अशी आठवण विराट कोहलीने सांगितली.

भारत-पाकिस्तान सामना झाल्यानंतर कोहलीने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्याने त्याच्या क्रिकेट कारकीर्दीत केलेल्या चुकांविषयी भाष्य केले. तो पुढे म्हणाला की, ‘‘खेळामध्ये काही चुका होत असतात. या चुकांपासून धडा घेऊन तशाच परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज राहिले पाहिजे.

कोहली म्हणाला, ‘‘नाणेफेक गमावल्यांनतर टीम इंडियाने एकूण २००हून अधिक धावा उभारण्याचे नियोजन केले होते. यासाठी चांगली सुरुवात झाली; पण मधल्या फळीत निराशाजजक कामगिरीमुळे झाली. सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या केवळ ४० धावा जोडून डगआउटमध्ये परतले. स्कोअर किमान २०० असता तर आपण जिंकू शकलो असतो. २० ते २५ धावा कमी पडल्या.

कोहली पुढे म्हणाला, ‘‘जेव्हा मी कसोटी कर्णधारपद सोडले, तेव्हा फक्त महेंद्रसिंह धोनीने मेसेज केला होता. टीव्हीवर बरेच लोक सल्ले देत होते. लोकांना टीव्हीवर खूप काही बोलायचे असते. माझा पर्सनल नंबर अनेकांकडे आहे; पण कोणाचा मेसेज आला नाही. कोहलीनेही उघडपणे टीका करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देताना सांगितले की, ‘‘मला काही सांगायचे असेल तर वैयक्तिकरीत्या सांगा. अनेकांकडे माझा नंबर आहे. माझ्या कामाबद्दल काही सांगायचे असेल किंवा सुचवायचे असेल तर तुम्ही मला वैयक्तिकरीत्या सांगू शकता. जगाला कळून काय उपयोग?” आशिया चषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यातील लढत रोमहर्षक ठरली.

या सामन्यात पाकिस्तानने भारतावर पाच गडी राखून विजय मिळविला. हा सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाने सर्वतोपरी प्रयत्न करूनही काही चुकांमुळे संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी १८२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या सामन्यात विराट कोहलीने ४४ चेंडूंमध्ये ६० धावा करीत धडाकेबाज फलंदाजी केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in