भारतीय बॉक्सिंग संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्जांची मागणी

भारतीय बॉक्सिंग संघाच्या प्रशिक्षकपदासाठी मंगळवारी नव्या अर्जांची मागणी करण्यात आली. विशेषत: भारतीय संघाला विदेशी प्रशिक्षकाची गरज असल्याचे भारतीय बॉक्सिंग महासंघाच्या (बीएफआय) पदाधिकाऱ्याने सांगितले.
भारतीय बॉक्सिंग संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्जांची मागणी
प्रातिनिधिक फोटो
Published on

नवी दिल्ली : भारतीय बॉक्सिंग संघाच्या प्रशिक्षकपदासाठी मंगळवारी नव्या अर्जांची मागणी करण्यात आली. विशेषत: भारतीय संघाला विदेशी प्रशिक्षकाची गरज असल्याचे भारतीय बॉक्सिंग महासंघाच्या (बीएफआय) पदाधिकाऱ्याने सांगितले.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॉक्सर्सना पदक जिंकण्यात अपयश आले. लवलिना बोर्गोहैन, निशांत देव यांना उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागल्याने पदकाने हुलकावणी दिली, तर जागतिक सुवर्ण विजेत्या निखत झरीनला दुसऱ्या लढतीतच पराभवाला सामोरे जावे लागले. सध्या दिमित्री दिमित्रुक हे भारताचे विदेशी प्रशिक्षक आहेत. मात्र त्यांचा कार्यकाळ ठरल्याप्रमाणेच सुरू असेल. अतिरिक्त नव्या विदेशी प्रशिक्षकाची पुढील ऑलिम्पिकपर्यंत नेमणूक करण्यात येणार आहे, असे महासंघाच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

२०२०च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये लवलिनाने कांस्यपदक जिंकले होते. तसेच २०१२मध्ये मेरी कोमने पदक पटकावले होते. मात्र २०१६ व २०२०४च्या ऑलिम्पिकमध्ये बॉक्सर्सने निराशा केली. त्यामुळे आता २०२८च्या ऑलिम्पिकच्या दृष्टीने संघ तयार करण्याचे महासंघाचे उद्दीष्ट आहे.

logo
marathi.freepressjournal.in